भ्रष्टाचा-यांच्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कुटुंबियांना आवाहन !

‘व्यक्तीचे नोकरीच्या ठिकाणचे वेतन राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी गृहिणी, त्यांची युवक मुले आणि नातेवाईक यांना ज्ञात असते. अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम ते घरी आणत असले, तर ते ‘भ्रष्टाचाराने पैसे मिळवत आहेत’, हे लक्षात घ्या. हा राष्ट्राच्या संदर्भात अक्षम्य गुन्हा आहे ! गुन्ह्याचे मूक साक्षीदार बनून तुम्ही गुन्ह्यात सहभागी होऊ नका, तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे पापाचे पैसे असतात. … Read more

हिंदु धर्माची किंमत नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात. त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू आणि साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माची किंमत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

स्वेच्छा लवकर नष्ट करण्याच्या संदर्भात आश्रमात रहाण्याचे महत्त्व

‘दिवसभर साधकाच्या हातून ज्या कृती होतात, त्या स्वेच्छेने होत असतात. स्वेच्छा नष्ट करण्यासाठी आश्रमात रहाणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. आश्रमात राहिल्यावर प्रत्येक गोष्ट कोणीतरी सांगितल्याप्रमाणे करावी लागते. त्यामुळे स्वेच्छा लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०१७)

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते,…

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणार्‍यांनाच माणूस म्हणता येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.११.२०१६)

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील…

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील अध्यात्म मानसिक स्तरावरचे आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.३.२०१७)

कधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि…

कधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि त्यासाठी हिंदूंच्या एकजुटीची अतिशय आवश्यकता असतांना, जातीनुसार आरक्षण देणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही राज्यकर्ते अन् राजकारणी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१६)

आधुनिक शिक्षण

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.२.२०१७)

अनुभवातून शहाणे न होणार्‍या भारतातील हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, यात काय आश्‍चर्य !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला हिंदूंनी मत दिल्यामुळे तो निवडून आला, तरी देशाची स्थिती सुधारली नाही. हे लक्षात आल्यावर पुढच्या निवडणुकीत दुसर्‍या पक्षाला हिंदू मोठ्या आशेने निवडून आणतात. पुन्हा त्यांना आधीचाच अनुभव येतो. त्यामुळे ते पुढच्या निवडणुकीत पुन्हा पहिल्या पक्षाला मोठ्या आशेने निवडून आणतात. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांत असे अनेकदा होऊनही … Read more

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये भाव आणि कुटुंबभावना वाढीस लागणे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून गेली ५ वर्षे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. प्रतिवर्षी भारतातील अनेक राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, या देशांमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. याचा झालेला लाभ म्हणजे या अधिवेशनांमुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमधील संघटितपणा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता एकमेकांविषयी कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र … Read more