चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

नामजप आणि यज्ञ

१. ‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे. २. काही साध्य करण्यासाठी एखाद्याला नामजप अनेक दशके करावा लागतो. याउलट यज्ञ काही सात्त्विक पुरोहितांनी काही तास किंवा दिवस केल्यास २० – २५ किलोमीटर अंतरातील सहस्रो लोकांनाही त्याचा लाभ होतो. ’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारत देशाचे महत्व

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल. -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु संस्कृती

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

देव सर्वत्र आहे

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’