सध्याच्या काळात मतदान करण्यासाठी चांगले उमेदवार मिळणे कठीण झाले आहे !

‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आंतरिक ‘मेक-अप’ चे महत्त्व !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक

‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे पाश्चात्त्य विचारसरणी, तर कुठे हिंदु धर्म !

‘पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे. याउलट हिंदु धर्म ईश्‍वरप्राप्तीसाठी, म्हणजे चिरंतन आनंदप्राप्तीसाठी मार्गदर्शन करतो; म्हणून हिंदु धर्माचे पालन करणारा कधीच दुःखी होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंतर्ज्ञानी भारतीय ऋषि !

‘पाश्‍चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !

‘सत्ययुग ते द्वापरयुग या काळात सर्वजण सात्त्विक असायचे. त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प असायचे. ते साधना करत असल्यामुळे त्यांचा एकमेकांना समजून घेण्याचा भाग होत असे. कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता वाढत चालल्यामुळे लग्न टिकणे कठीण होऊ लागले आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१२.२०२१)

स्वयंपाकघरातील सेवेचे महत्त्व !

‘कुटुंब असो वा आश्रम असो, प्रत्येकाचा स्वयंपाकघराशी संपर्क असतो. त्यामुळे येथे सेवा केल्यास प्रत्येकाशी संपर्क येतो. येथे प्रत्येकाची आवड-नावड, पथ्य या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे अनेकांशी जवळीक होते. याचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे, आपण स्वतःला विसरून इतरांचा विचार करू लागतो. त्यातून अहं अल्प होतो आणि प्रेमभाव वाढतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०२१)

स्मशानामध्ये ‘अश्मा’ ठेवण्याची सोय करावी, हेही शासनाला न सांगणारे लज्जास्पद लोकप्रतिनिधी !

‘धर्मशास्त्रानुसार स्मशानातील अंत्यविधींसाठी ‘अश्मा’ अत्यावश्यक आहे; परंतु आजकाल शहरांमध्ये आवश्यक त्या आकाराचा दगड ‘अश्मा’ म्हणून मिळणे कठीण जाते. यासाठी शासनाने स्मशानभूमीमध्ये ही सोय करणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनो, लोकांच्या अशा लहान लहान आवश्यकता लक्षात घेऊन त्यांची स्वतःहून पूर्तता केली, तर निवडणुकांपूर्वी मते मागण्यासाठी घरोघरी जावे लागणार नाही, हे लक्षात घ्या !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले … Read more