परमात्म्याचे होण्यासाठी काय करावे ?

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त … Read more

खरा परमार्थी

खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्‍याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्याला इतर सर्वजण परमेश्‍वररूप भासतात. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

भगवंताचे नाम

१. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. २. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे. – श्री गोंदवलेकर महाराज (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)