साधनामार्गात कितीही अडथळे आले, तरी आपल्यात जिद्द, चिकाटी, श्रद्धा आणि शरणागत भाव असेल, तर आपण सर्व अडथळे पार करून ईश्वतरप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो !

एका साधकाने भ्रमणभाषवर चलचित्र पाठवले होते. त्यामध्ये एक बदक आपल्या ११ पिल्लांसह आहे. बदक आपल्या अन्नाच्या शोधात आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन जात आहे. मार्गात पायर्‍या लागतात. बदक त्या चढून सहज वर जाते; मात्र बदकाच्या पिल्लांना पायर्‍या चढणे सहज जमत नाही. ती छोटी छोटी पिल्ले एक एक पायरी चढण्यासाठी पुष्कळ श्रम घेतात. त्यात ती एक … Read more

साधकांनो, परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या केवळ आज्ञापालनाने उद्धार होणारच आहे, अशी श्रद्धा ठेवून साधना करा !

आम्ही साधक पुष्कळ भाग्यवान आहोत. आम्हाला मानवजन्म मिळाला आहे. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या जन्माचे सार्थक होण्यासाठी निरनिराळे उपाय सांगितले आहेत. त्यांची साधकांवर कृपा आहेच. त्यांच्या केवळ आज्ञापालनाने साधकांचा उद्धार होणारच आहे, हे लक्षात ठेवून साधना करणे, एवढेच साधकांचे कार्य आहे.

समर्थ पाठीशी उभा असल्याची दृढ श्रद्धा असलेला निर्भयपणे कार्यरत रहातो !

समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ?, असे समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे. समर्थ म्हणजे सम + अर्थ होय. समेला अर्थ आहे. त्यात शक्ती आणि चैतन्य आहे. विठ्ठल दोन विटांवर (द्वैत) उभा आहे, म्हणजे तो समेवर (लाभ होवो किंवा अपलाभ होवो, सर्व सारखे) उभा आहे, याचे दर्शक आहे. त्यामुळे कोटी कोटी ब्रह्मांडांचे ओझे … Read more

भाषाशुद्धीद्वारे चैतन्याचा प्रसार !

‘परकियांच्या आक्रमणांमुळे मराठी भाषेत अन्य भाषांतील शब्दांचा शिरकाव झाल्याने मराठी भाषेची तेजस्विता आणि तिचा प्रभाव उणावला होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य भाषांतील शब्दांच्या ठिकाणी मराठी शब्दांचा उपयोग करायला लावून मराठी भाषेतील शब्दांना महत्त्व दिले. मराठी भाषेत योग्य शब्दाला खूप महत्त्व आहे. त्याला अर्थ आहे आणि त्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे; म्हणून त्याला ‘शब्दब्रह्म’ म्हटले … Read more

चैतन्याचा प्रसार करा !

सध्या आधुनिक कृत्रिम अशुद्ध धाग्यांनी बनलेले असात्त्विक कपडे वापरल्याने रज-तमाचा प्रसार होत आहे. एवढेच नव्हे, तर कपड्यांवरील नक्षीकामही अनिष्ट शक्तींनी भारलेले असते. साहजिकच त्यांतून रज-तमाचा प्रभाव वाढतो. यासाठी सात्त्विक वेशभूषा केली पाहिजे. सध्या आवडी-निवडीचा प्रसार केला जातो. माल विकला जावा, यासाठी दुकानदार त्याचे विज्ञापन करतो आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःचे पैसे व्यय करून … Read more

राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांनी समाजाची दुःस्थिती पाहून निराश न होता तन-मन-धनाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान कार्यात सहभागी व्हावे !

सध्या दूरचित्रवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून समाजाची बिकट स्थिती लक्षात येते. समाजात देवता आणि महापुरुष यांचे विडंबन, आर्थिक घोटाळे, बलात्कार इत्यादी समाज, राष्ट्र आणि धर्म यांवर घाला घालणारे प्रसंग घडत आहेत. अशा वेळी राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे आणि ही स्थिती पालटायला पाहिजे, असे वाटते; पण नेमकेपणाने त्यासाठी काय करायला … Read more

हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत असल्याने सात्त्विकतेचा ऱ्हास होत आहे !

आपण असत्याला सत्य समजतो. समजण्यात भेद झाला, तर विचारांत भेद होतो. विचारांत भेद झाला, तर कार्यात भेद होतो. आपण गणपति उत्सव हा समष्टी पूजा म्हणून करतो; पण तोही विकृत स्वरूपात साजरा होतांना दिसून येतो. पूजेचा योग्य अर्थ न समजल्यामुळे असे झाले आहे. हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत आहे. त्यामुळे सात्त्विकतेचा र्‍हास होत आहे. खर्‍या … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

सध्याचे मराठी साहित्य संमेलन हे अगदी खालच्या स्तरावर चालू आहे. त्यामुळे साहित्याची अधोगती होत आहे. हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. साहित्य हे समाज आणि परिस्थिती यांचे दर्शन घडवते. ॐकाराला ब्रह्म म्हटले आहे. ॐकाराद्वारे शब्दांची निर्मिती झाली आहे. या शब्दसामर्थ्यामुळे मानवाला ज्ञान प्राप्त होत आहे. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य साधनेमुळे निर्माण होते; म्हणूनच ऋषिमुनींनी निर्माण … Read more

संयम ठेवून चांगले वागल्यासच प्रगती शक्य !

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ – ईशावास्योपनिषद, मंत्र १ अर्थ : या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व आहे. तेव्हा त्यागी वृत्ती (संयम) ठेवून जगाचा उपभोग घे. (आपल्या उन्नतीसाठी (प्रभुकार्यासाठी) कार्य कर); परंतु त्याच वेळी कुणाच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस. सध्या ‘बहिर्मुख राहून तसे वागल्याने आणि भगवंताने दिलेली … Read more