तुलनेचीही आवश्यकता !

‘जागृतीसाठी तुलना आवश्यक आहे. तुलनेमुळे आपली स्थिती कळते. पशु-पक्ष्यांना केवळ भोग भोगायचे असतात. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, तर त्याचा लाभ करून घेतला पाहिजे. ‘आज आपण आश्रमात राहिलो नसतो, साधना केली नसती, तर आज आपली परिस्थिती काय झाली असती ? चाकरी केली असती, तरी त्यात किती धन मिळाले असते ? कसे राहिलो असतो ? आतापर्यंतच्या सहस्रो … Read more

अनुभूतीजन्य विचार मार्गदर्शक असणे

‘मनुष्याने विचार करू नये’, असे नसते; मात्र कोणत्या विचारांपासून काय लाभ होतो, हे पहायला पाहिजे. ‘कोणत्या विचारांनी उन्नती होते आणि कोणत्या विचारांनी अवनती होते ?’, हे पहायला हवे. विचार हा मार्गदर्शक आहे. तो वाटाड्या आहे. त्याला ज्ञानाने समर्थ करणे आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे अनुभूतीजन्य विचार. ते घेऊन पुढे चालणे आवश्यक आहे. रानटी लोकांना कोण मार्गदर्शक … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंता, तू किती रे करतोस ! तूच सर्वत्र कार्य करत आहेस’, अशी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत ठेवली की, अनिष्ट शक्ती रहात नाही. आपला अहं उघड करणे, हा मोठेपणा आहे. त्याने अहं अल्प होतो.’

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे खरे गो-पालक राज्यकर्ते हवेत !

‘छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या १२ व्या वर्षी विजापूरला शहाजीराजांकडे गेले असतांना रस्त्यात गायीची हत्या होत असलेली पाहून त्यांनी त्वरित गायीवर घाव घालत असलेल्या कसायाचा हात वरच्या वर छाटून टाकला. यामुळेच शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक राजा’ असे संबोधतात. ‘आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे’, असे आज राज्यकर्ते सांगतात; मग संपूर्ण देशभरात ‘गोहत्याबंदी कायदा’ आणण्यासाठी ते का झटत नाहीत … Read more

साधकांनो, जप म्हणजे काय आणि भगवंताचा जप सतत करण्याची आवश्यकता काय ?

‘जप म्हणजे काय ? भगवंताचा सतत जप करण्याची आवश्यक काय ? सतत भगवंताशी अनुसंधानित रहाणे, म्हणजे सतत ‘भागवत’ (भगवंताची स्तुती) चालू रहाणे होय. भागवतातील गोष्टी या अनुभूती आहेत. भगवंताची सतत स्तुती करत रहाणे, हेच जीवनाचे लक्षण आहे. सतत त्याच्या ‘स्मरणात’ रहाणे, हे जीवन आहे. येथे सर्वत्र चैतन्य ठासून भरले आहे. तसेच चैतन्याचे स्मरण करणे, ‘चैतन्याविना … Read more

चैतन्यच कार्य करते !

‘साधकांनो, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या भगवंताने दिलेल्या पंचतत्त्वांतून चैतन्य ग्रहण करणे अन् त्या चैतन्याद्वारे कार्य होत असल्याचे पहाणे, एवढेच आपले काम आहे; कारण चैतन्यच कार्य करते; परंतु आपण बाह्य स्वरूपाकडे पहातो, म्हणजे आवरणाशी संबंध ठेवतो.’ भगवंतावर श्रद्धा हवी ! ‘आपण इतकी वर्षे आयुष्य व्यतित केले, तरी उद्याची चिंता रहातेच. भगवंतावर श्रद्धा नाही. … Read more

निष्काम भक्तीचे महत्त्व

सतत काहीतरी मागणार्‍या मुलापेक्षा काहीच न मागणार्‍या मुलाकडे आईचे जास्त लक्ष असते; कारण तिला ठाऊक असते की, हे मूल काहीच मागणार नाही. तसेच काही न मागणार्‍या भक्ताकडे ईश्‍वराला आपणहून आईसारखे धावून यावे लागते. चूक लिहितांना या प्रसंगात मी माझ्या या दोषामुळे भगवंतापासून दूर गेलो, असे लिहावे.

ईश्वरेच्छेने केलेले कर्म, म्हणजे साधना !

‘प्रार्थना करून भगवंताच्या बुद्धीने, म्हणजे ईश्‍वरेच्छेने केलेले कर्म, म्हणजे साधना ! सहज झालेली कृती, म्हणजेच कर्म; म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. ‘तोच सर्व करतो’, असा भाव ठेवावा आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करावी.’

चुकीसाठी प्रायश्चित्त घेऊन ती सुधारणे आवश्यक

‘मनुष्य चूक करतो आणि स्पष्टीकरण देतो. ‘स्पष्टीकरण देतो, समर्थन करतो’, म्हणजेच चुकीला जोपासतो आणि चूक वाढवतो. चुकीत वाढ करून तो पापच वाढवतो. त्याने झालेल्या चुकीचे प्रायश्‍चित्त घेऊन चूक सुधारली पाहिजे.’

साधनामार्गात कितीही अडथळे आले, तरी आपल्यात जिद्द, चिकाटी, श्रद्धा आणि शरणागत भाव असेल, तर आपण सर्व अडथळे पार करून ईश्वतरप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो !

एका साधकाने भ्रमणभाषवर चलचित्र पाठवले होते. त्यामध्ये एक बदक आपल्या ११ पिल्लांसह आहे. बदक आपल्या अन्नाच्या शोधात आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन जात आहे. मार्गात पायर्‍या लागतात. बदक त्या चढून सहज वर जाते; मात्र बदकाच्या पिल्लांना पायर्‍या चढणे सहज जमत नाही. ती छोटी छोटी पिल्ले एक एक पायरी चढण्यासाठी पुष्कळ श्रम घेतात. त्यात ती एक … Read more