चित्रकारांनो, आपण कोणासाठी चित्र काढत आहोत, हे लक्षात घेऊन चित्र काढा !

‘चित्र काढतांना ते दुसर्‍यासाठी असल्यास त्यांच्या आवडी लक्षात घेऊन ते काढा. चित्र साधकांसाठी असल्यास त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यातून चैतन्याची अनुभूती येणे आवश्यक असते, तर चित्र इतरांसाठी असल्यास त्यांच्या सुखासाठी ते डोळ्यांनी चांगले दिसणे आवश्यक असते.’

विज्ञानातील प्रयोग चुकू शकतो; पण अध्यात्मातील कोणताही प्रयोग चुकत नाही अथवा निष्फळ ठरत नाही !

अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा कलियुगामधे अनेक लोक विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. ते सर्व प्रयोग यशस्वी होतातच, असे नाही. कित्येकदा विज्ञानातील प्रयोग चुकल्यामुळे त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ, आर्थिक गुंतवणूक आणि वेळ अशी सर्व प्रकारची ऊर्जा प्रयोगाच्या अंती वाया जाते, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अध्यात्मात मात्र तसे होत नाही. साधकाने ईश्‍वराला संपूर्ण शरण जाऊन श्रद्धा … Read more

काही आल्हाददायक गोष्टी परिणामी मृत्यूला कारण ठरतात !

‘काही गोष्टी आल्हाददायक असतात; परंतु परिणामी घातक ठरतात. व्याध हरिणाला पकडण्याकरताच मधुर वाद्य वाजवतो. हरिणाला ते गाणे गोड वाटते; पण ते मृत्यूला कारण होते.’

हिंदु राष्ट्रात असे राज्यकर्ते असतील !

‘अथर्ववेद कांड ७, सूक्त ९२, ऋचा १ मध्ये म्हटले आहे, ‘राष्ट्राचे रक्षण करणारा, राष्ट्र समर्थ करणारा, राष्ट्राला साधन संपन्न करणारा, गुप्त रूपाने साम-दाम-दंड-भेद उपायांद्वारे दुष्ट शक्तींचे निर्मूलन करणारा, अशा प्रकारे उत्तम शासन करणारा, गुणवान, ‘सर्वांना सुख मिळावे’, असा मनापासून विचार करून राज्य करणारा राजा असावा.’

त्रास असणाऱ्या साधकांनो, त्रासामुळे पुनःपुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निराश होऊ नका !

‘त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण सारखे सारखे येतच असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून ‘त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात’, असे लक्षात आले आहे. चुका झाल्यावर त्याविषयी सतर्क होऊन चुका होऊ नयेत, यासाठी उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर … Read more

एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more

अवतारी कार्यात धर्मग्लानी दूर करून सत्धर्म स्थापन करणे, हेच ध्येय असणे

धर्मग्लानी दूर करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतात. ते दृष्टांचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करतात. तेव्हा ते मायेतील संबंध बाजूला ठेवतात. जसे मामा असूनही कृष्णाने कंसाचा वध केला. कौरव-पांडव भाऊ असूनही कौरवांच्या दृष्ट वृत्तीमुळे पांडवांनी त्यांचा नाश केला. अगम्य कर्तृत्व त्या वेळी भारतात सर्वत्र मुसलमानी राज्य असूनही अगम्य क्षात्रतेज युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पाच … Read more