प्राधान्य न कळणारे धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी !

लव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनीदेवाच्या चौथर्‍यावर चढणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी हे लक्षात ठेवावे !

काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खाजगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडथळा म्हणजे हिंदु धर्माचे महत्त्व न समजलेले हिंदू !

मुसलमानांना इस्लाम धर्माचे आणि ख्रिस्तींना ख्रिस्ती धर्माचे महत्त्व ज्ञात असते. त्यामुळेच ते सर्व जग इस्लाम धर्माचे किंवा ख्रिस्ती धर्माचे करण्याचे शेकडो वर्षे अहर्निष प्रयत्न करत असतात. याउलट अतीशहाण्या, आंग्लाळलेल्या, बुद्धीप्रामाण्यवादी आणि स्वतःला सुधारक म्हणवणार्‍या हिंदूंनी हिंदु धर्माचा अभ्यास केलेला नसल्याने आणि थोडीफारही साधना केलेली नसल्यामुळे त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व समजत नाही. याउलट जगात कोठेही ईश्‍वरप्राप्तीची … Read more

समष्टी प्रारब्ध

युगानुसार व्यष्टी आणि समष्टी प्रारब्धाचे प्रमाण : व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जितका अधिक असेल, तितके त्या व्यक्तीला समष्टी प्रारब्ध भोगावे लागण्याचे प्रमाण अल्प होत जाते.   युग व्यष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) समष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) १. सत्य १०० – २. त्रेता ७० ३० ३. द्वापर ५० ५० ४. कलि अ. आरंभी आ. मध्य इ. … Read more

अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे !

विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिष्यांना शिकवण्याच्या संदर्भात एका संतांचा अहंभाव !

एका संतांनी माझ्याशी बोलतांना शिष्यांना बाहेर जायला सांगितले. तेव्हा मला वाटले, त्यांना काहीतरी खाजगी बोलायचे असेल. बोलतांना खाजगी असे काहीच नव्हते. नंतर शिष्य भेटले. तेव्हा त्यांनी सांगितले, गुरूंनी आज खूप छान सांगितले. मी म्हणालो, मला सांगा. मलाही काही शिकता येईल. शिष्यांनी जे सांगितले, ते मी गुरूंशी बोलतांना त्यांना सांगितलेलेच होते ! असे अहंभावी गुरु शिष्यांचे … Read more

ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग

विश्‍वाची उत्पत्ती कशी झाली, यासंदर्भात ज्ञानयोगात अनेक पाठभेद आहेत; पण ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गांसंदर्भात निरनिराळे मार्ग असले, तरी त्यांत पाठभेद नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्म

युगानुयुगे जगात भारताला महत्त्व आहे, ते केवळ हिंदु धर्मामुळे आहे आणि त्यालाच नष्ट करायला निघाले आहेत बुद्धीप्रामाण्यवादी, विद्रोही आणि साम्यवादी ! पुढे त्यांच्या लक्षात येईल की, ते स्वतःच नष्ट होत आहेत आणि हिंदु धर्म अनंत काळ टिकणार आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतरांना मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

मानसिक स्तर वरवरचे तात्कालिक साहाय्य करणारा असतो, तर आध्यात्मिक स्तर अडचण मुळापासून दूर करणारा असतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. १. मानसिक स्तर : भुकेलेल्याला अन्न द्या, असे म्हणणारे मानसिक स्तरावरचे असतात. ते भुकेलेला भुकेला का आहे ?, याचा विचार करत नाहीत. त्यामुळे भुकेल्याला कोणालातरी आयुष्यभर अन्न द्यावे लागते. २. आध्यात्मिक स्तर : साधना कर. … Read more

नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक आणि राज्यकर्ते असल्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत !

या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले