हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडथळा म्हणजे हिंदु धर्माचे महत्त्व न समजलेले हिंदू !

मुसलमानांना इस्लाम धर्माचे आणि ख्रिस्तींना ख्रिस्ती धर्माचे महत्त्व ज्ञात असते. त्यामुळेच ते सर्व जग इस्लाम धर्माचे किंवा ख्रिस्ती धर्माचे करण्याचे शेकडो वर्षे अहर्निष प्रयत्न करत असतात. याउलट अतीशहाण्या, आंग्लाळलेल्या, बुद्धीप्रामाण्यवादी आणि स्वतःला सुधारक म्हणवणार्‍या हिंदूंनी हिंदु धर्माचा अभ्यास केलेला नसल्याने आणि थोडीफारही साधना केलेली नसल्यामुळे त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व समजत नाही. याउलट जगात कोठेही ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असलेला कोणी असला, तर तो मार्गदर्शनासाठी जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात हिंदु धर्म शिकण्यासाठी येतो. पिकते तिथे विकत नाही आणि दिव्याखाली अंधार या म्हणी सार्थ करणारे धर्मद्वेष्टे हिंदू हेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडथळा आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.११.२०११)