हिंदूंच्या ज्योतिषशास्त्राचे महत्त्व

व्यक्तीगत ग्रहांवरून व्यक्तीचे कालमहात्म्य कळते, तर मेदनीय ज्योतिष आणि संख्याशास्त्र आदींवरून समष्टीचे कालमहात्म्य कळतेे, उदा. भारताचे भविष्य पहाण्यासाठी देशाचे नाव, देश स्वतंत्र कधी झाला ती कुंडली; एखाद्या संस्थेचे भविष्य पहाण्यासाठी संस्था स्थापन झाली त्या वेळेची कुंडली, संस्थेचे नाव, संस्था प्रमुखाचे नाव आणि त्याची कुंडली; एखाद्या कुटुंबाचे भविष्य पहाण्यासाठी कुटुंब प्रमुखाची कुंडली. यावरून ज्योतिषशास्त्रात भारत इतर … Read more

काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात आनंद मिळण्याचे कारण

बसून नामजप करण्यापेक्षा काही साधकांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. याचे कारण म्हणजे जे ध्यानमार्गी असतात, त्यांना बसून नामजप करणे चांगले वाटते. समष्टी साधना करणार्‍यांना सेवा करत नामजप करण्यात अधिक आनंद मिळतो. (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रेष्ठ कोण संत चोखामेळा कि विद्रोही ?

संत चोखामेळा यांना विठोबाच्या दर्शनासाठी देवळात जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी विद्रोहींसारखा हट्ट केला नाही. त्यांच्या भक्तीमुळे विठोबाने त्यांना स्वतःच्या गळ्यातला हार दिला. श्रेष्ठ कोण संत चाेखामेळा कि विद्रोही ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पांडित्य आणि साधना

१. पोहोण्याचे पुस्तक वाचून पोहता येत नाही, तसे नामजपाची अनेक पुस्तके वाचून नामजप होत नाही किंवा साधनेवरील अनेक पुस्तके वाचून साधना होत नाही; कारण साधना हे कृतीचे शास्त्र आहे. २. ग्रंथांचा अभ्यास करून त्यांतील विषयावर एखाद्या प्राध्यापकांप्रमाणे प्रवचन देता येईल; पण त्यामुळे साधनेत प्रगती होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्राभिमान

आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोमाता

आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. हा कृतघ्नपणाचा कळस होय ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अनुभूती येण्यामागील कारणे

१. प्रवासात असतांना एखादे दृष्य का दिसते ? त्याच्यापाठी काही कारण नसते, तर वाटेतील ते अनुभव असतात. त्याप्रमाणे अध्यात्मातल्या सूक्ष्मातील प्रवासात अनुभूती येतात. २. ईश्‍वराला अनुभूतीतून काहीतरी शिकवायचे असते. ३. कधी मायावी वाईट शक्तीही चांगल्या अनुभूती देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारताची कल्पनातीत भयानक अशी वस्तूस्थिती !

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशात ५००० चपराशांच्या नोकर्‍यांसाठी २३ लक्ष अर्ज आले होते. अर्ज करणार्‍यांपैकी काही जण विद्यावाचस्पती (डॉक्टरेट केलेले) होते ! – अज्ञात ————————————————————————————————————— लोकशाहीने दिलेल्या या वस्तूस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ

एका वर्षात १२ मास असतात. प्रत्येक मासात ४ आठवडे असतात. प्रत्येक आठवड्यात ७ वार असतात. प्रत्येक वारात २४ घंटे (तास) असतात. प्रत्येक घंट्यात ६० मिनिटे असतात आणि प्रत्येक मिनिटात ६० सेकंद असतात. त्यामुळे एखाद्या सेकंदाचा काळाच्या संदर्भात उल्लेख करायचा असेल, तर तो वर्ष २०१५ मधील जुलै मासांतर्गत तिसर्‍या आठवड्यातील गुरुवार, सकाळी १० वाजून १० मिनिटे … Read more

कुठे आधुनिक न्यायप्रणाली, तर कुठे अध्यात्मशास्त्र !

अध्यात्मात वय पाहिले जात नाही, तर वृत्ती, कृती पाहिली जाते; म्हणून लहान वयांच्या संतांच्याही सर्वजण पाया पडतात. याउलट आधुनिक विचारसरणीची न्यायप्रणाली केवळ वय पहाते; म्हणून गुन्हेगारी करायची बुद्धी असलेल्यालाही बालच समजते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले