जे जमत नाही, त्यासाठी प्रयत्न करणे, ही साधनाच आहे !

काही साधक सेवा परिपूर्ण जमत नाही म्हणून निराश होतात. काही साधक व्यष्टी साधनेतील प्रयत्न नीट जमत नाहीत म्हणून निराश होतात. परिपूर्ण सेवा करणे आणि साधनेच्या प्रयत्नांतील परिपूर्णता, हे साध्य आहे. एखाद्या गोष्टीतील अपूर्णत्व, हे त्यासंदर्भात अजून आपल्याला शिकायचे आहे, याचेच निर्देशक आहे. शिकण्यात आनंद आहे, हे प.पू. डॉक्टरांचे वाक्य सतत लक्षात ठेवले, तर आपण करत असलेल्या प्रयत्नांतून आपल्याला आनंदही मिळेल. तसेच ईश्‍वराविना परिपूर्ण कोणीच नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. जे जमत नाही, ते करायचा प्रयत्न करणे, ही साधनाच आहे.
– (पू.) श्री. संदीप आळशी (२२.१२.२०१५)