आहाराचा मनावर होणारा परिणाम !

‘आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते. शुद्ध आहार, शुद्ध वृत्तीच्या मनुष्याकडून झालेली शुद्ध पाकसिद्धी, भोजनाच्या पंक्तीतही आपल्या नुसत्या दर्शनाने सद्भाव उत्पन्न करू शकणार्‍या उच्चकोटीतील आदर्श व्यक्तींची उपस्थिती आणि त्या समवेतच त्या वेळी आपले मनसुद्धा जर परमात्म्याच्या उच्च आणि पवित्र अशा विचारांनी युक्त असेल, तर त्यामुळे त्या खाल्लेल्या अन्नाद्वारे आपले मन शुद्ध, पवित्र आणि निर्मळ राहून सत्कर्मास प्रेरणा मिळेल आणि ते परमात्म साधनेस सुद्धा अनुकूल राहील.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर – संदेश’, जुलै १९८८)

Leave a Comment