व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग

१. ‘सर्वांचेच अधिकार सारखे नसतात. नियम हे सर्वसाधारण माणसांच्या धोरणाने आखलेले असतात. एकच नियम सर्वांना लागू पडत नाही. पूर्वार्जिताप्रमाणे स्वभाववैचित्र्य असते. उत्तम आचार जरी असला, तरी एक आचार सर्वांनाच लागू होत नाही.

२. ‘न हि सर्वहितः कश्‍चित् आचारः सम्प्रवर्तते ।’

– महाभारत, पर्व १२, अध्याय २६६, श्‍लोक १७

अर्थ : सर्वांसाठी हितकर असेल, असा कोणताही नियम नसतो. (प्रत्येक नियमाला अपवाद असतोच.)

सर्वांच्याच भूमिका एकसारख्या नसल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या माणसांनाही मार्गदर्शन होण्यासाठी निरनिराळा उपाय सांगून ठेवावा लागतो, निरनिराळे; पण शास्त्रीयच आचार सांगावे लागतात.

३. थोडी सूट दिली की, शेवटच्या थराला जाऊन पोचणे, हा समाजाचा एक स्वभाव आहे.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, नोव्हेंबर १९८८)

Leave a Comment