स्वतःतील उणिवा दूर केल्यामुळे होणारा आत्मसूर्याचा साक्षात्कार !

जो दुसर्‍याच्या उणिवा काढण्यात चांगल्या प्रकारे निपुण असतो, तसाच जर तो स्वतःतील उणिवा समजून घेऊन त्या काढण्यात निपुण झाला, तर तो मुक्त का होणार नाही ? ‘दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’.

‘स्वाज्ञान जानि नो विरला ।’

स्वतःचे दुर्गुण जागरूकतेने जाणून घेणे !

त्याने जर जागरूकतेने स्वतःमधील दुर्गुण जाणून घेतले आणि त्यांच्यापासून मुक्त होऊन जर तो निरहंकारी बनला, तर त्याचे अखंड आत्मानुसंधान साधले जाईल. मग त्याला तितक्याच स्पष्टपणाने मोक्षमार्गाचे ज्ञान होऊन त्याला आत्मसूर्याच्या प्रकाशाचा साक्षात्कार होईल !

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर संदेश’, मार्च १९९५)

Leave a Comment