नेहमी सत्संगात रहावे !

‘व्यवहारात ‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत् ।’ म्हणजे ‘परस्त्रीला मातेसमान आणि परधनाला मातीच्या ढेकळासमान मानावे.’ ही दृष्टी कधीच घालवू नये. ‘अति तेथे माती’ म्हणजे ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो.’ निसरड्यावर जपून चालावे. गृहस्थाला परस्त्री आणि परधन विष होय. याविषयी निःस्पृहांना दोन्हीकडचा ‘पर’ शब्द काढून ‘स्त्री आणि धन विष आहे’, असे सांगितले म्हणजे पुरे ! विषाची परीक्षा कुणी बघू नये. सद्ग्रंथातून हे पथ्य पाळण्याविषयी बजावले आहे. अत्यंत तोल सांभाळून वागावे.’ कारण…

येके संगतीनें तरती । येके संगतीनें बुडती ॥
याकारणें सत्संगती । बरी पाहावी ॥

दासबोध, दशक १४, समास ७, ओवी २६

अर्थ : संगतीनेच एखादा तरतो, तर संगतीनेच एखादा बुडतो; म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच करावी.

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘अमृतवाणी’, जानेवारी १९९६)

Leave a Comment