मानसिकपेक्षा आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांच्या भाषणाचा परिणाम अधिक होणे, तो अधिक काळ टिकणे आणि म्हणूनच धर्मकार्य करणार्‍यांनी साधना करणे आवश्यक !

१. मानसिक (भावनिक) स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : याचा परिणाम तात्कालिक असतोे. सभा संपून श्रोते परतले की, सभेतील भाषण ते थोड्याच वेळात विसरतात. त्यामुळे कार्यासाठी
कार्यकर्ते तयार झाले, असे अल्प वेळा दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे राजकारण्यांच्या सभांना हजारो, लाखोंची उपस्थिती असली, तरी त्यांतील फारच थोडे त्यांच्या कार्यात सहभागी होतात.

२. आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : यांच्या सभांना उपस्थिती शेकडो किंवा काही सहस्त्र एवढीच असली, तरी त्यांच्या वाणीत चैतन्य असल्याने त्यांच्या भाषणाचा परिणाम अधिक होतो आणि तो अधिक काळ टिकतो. त्यामुळे त्यांच्या कार्यात सहभागी होण्यार्‍यांचे प्रमाण अधिक असते. स्वामी विवेकानंद हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांची भाषणे अजूनही वाचली जातात;

म्हणून राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्‍यांनी साधना करून वाणीत चैतन्य आणणे आवश्यक आहे.

– डॉ. आठवले

Leave a Comment