खर्‍या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक-दोन पिढ्या लागणार असल्याचे कारण

मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, हेच त्यांचे शिक्षण योग्य नसल्याचे एकमेव कारण नाही. घरी होणारी भांडणे, तसेच दैनिकांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या स्वैराचार, भ्रष्टाचार, जात्यंधता, अपहरण, बलात्कार, खून इत्यादी बातम्या यांमुळेही त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होतात. पुढे अशा बातम्यांचे त्यांना काही वाटेनासे होते आणि काही काळानंतर त्यांच्यातील काहीजण या गोष्टी स्वतःही करू लागतात.
मुलांवर अनिष्ट संस्कार होऊ नयेत, यासाठी समाजात अनिष्ट गोष्टी घडू नयेत, याला प्राधान्य द्यावे लागेल. यातच एका पिढीचा, म्हणजे ३० वर्षांचा कालावधी जाईल. त्यानंतरच्या पिढीत मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार झाल्याने हिंदु राष्ट्र अपेक्षित अशी पहिली पिढी तयार होण्यास आरंभ होईल.
– (प.पू) डॉ. आठवले (२६.११.२०१४)

Leave a Comment