हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या लढ्यात सनातनच्या साधकांचा मुख्य सहभाग ब्राह्मतेजाच्या रूपात असेल !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. सनातनचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचे कार्य प्रामुख्याने ब्राह्मतेजाच्या स्तरावर असेल. क्षात्रतेज म्हणजे शारीरिक क्षमता, प्रशिक्षण आणि मनाची तयारी. हे सर्व वर्षभरातही साध्य करता येते. आतंकवाद्यांना वर्षभरात तयार करतात, हे त्याचे नेहमीचे उदाहरण आहे. ब्राह्मतेज क्षात्रतेजाप्रमाणे वर्षभरात निर्माण करता येत नाही. ब्राह्मतेजासाठी तन-मन-धनाचा त्याग करून १० – १५ वर्षे तरी साधना करावी लागते. सनातनच्या साधकांनी अशी साधना केलेली असल्यामुळे ते ब्राह्मतेज वापरून, म्हणजे शापादपि (शाप देऊनसुद्धा) शत्रूचा नाश करून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेत सहभागी होतील. या लढ्यात इतर बहुसंख्य संघटनांना साधनेचा पाया नसल्यामुळे त्या क्षात्रतेज वापरतील, तर सनातनचे साधक ब्राह्मतेज वापरतील.
– (प.पू.) डॉ. आठवले (१.८.२०१२))

Leave a Comment