आजचा समाज

अ. ईश्वरप्राप्तीच्या ज्ञानाऐवजी केवळ भाकरीच्या तुकड्याला महत्त्व देणारा समाज !

विद्येचे रक्षण करणाऱ्या वर्गाचा सन्मान आणि योगक्षेम चालवायला तत्पर अशा विद्यासंरक्षक वर्गाला जिवंत ठेवण्याकरिता समाज ज्या प्रमाणात कटीबद्ध राहील, त्या प्रमाणात तो समाज प्रगमनशाली असतो. आजचे भाकरीचे तत्त्वज्ञान या दृष्टीकोनातून तपासून पाहा. आपण किती अधःपतीत होत आहोत, झालो आहोत आणि होणार आहोत, ते सहज ध्यानी येईल.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २००६)

आ. हल्ली मानवी प्रवृती अनाचार आणि अत्याचार यांकडे वळणे ध्यायते विषयान् ।….. – श्रीमदभगवद्गीता (२.६२/६३)

वासना तीव्र झाल्या की, ही प्रणाली मानवाच्या जीवनात आपोआप पसरते. नवीन पिढीचा धर्माचार कसा असावा, कसोटी कोणती ? आजची पिढी सांगते, अभिरुचीला पोषक तेच हिताचे. हा कौल तीव्र वासनांचा आहे. या वासनांचे अनुगमन होऊन समाज आणि त्यांतील आचारात ढवळाढवळ होऊ लागली. तीव्र वासनांचा परिणाम ‘प्रणश्यतीच्या (नाशाच्या) रोखाने झाला. आता समाज आणि व्यक्ती दोघांचाही विनाश अटळ आहे. तीव्र वासनांना आज सद्गुणांचे पांघरूण घातले जाते आहे. एकदा एखाद्या मोहाला बळी पडणारा मनुष्य पुन्हा त्या मोहाला सहज बळी पडतो. काम आणि क्रोध हे मानवाला वेडे करतात. त्याच्या हातून नाना पापे घडवतात. याचा अर्थ अनाचार आणि अत्याचार यांकडे मानवीप्रवृती वळते. भगवान गीतेत, इथे जे सांगतात, तेच मनु सांगतो आणि तेच शास्त्रकार सांगतात.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Leave a Comment