गुरु आणि ईश्‍वर

यांच्या संदर्भात बोलतांना बरेच जण पुढील ओळी सांगतात.
गुरु थोर की देव थोर म्हणावा
नमस्कार आधी कुणासी करावा ।
मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे
तयाचे प्रसादे रघुनाथ भेटे ॥
(पाठभेद –
गुरु थोर कि देव थोर म्हणावा
नमस्कार आधी कोणा करावा ।
मना माझीया गुरु थोर वाटे
जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ )

त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, गुरु द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्‍वराकडे कसे जायचे, हे शिकवतात. ईश्‍वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ईश्‍वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे. एखाद्याने एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता सांगितला किंवा वाटाड्या म्हणून तो सोबत आला, असे गुरूंचे नसते. ते सूक्ष्मातून आशीर्वाद देऊन शिष्याला ईश्‍वराकडे जायला बळ पुरवतात. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

Leave a Comment