आपण जीवनात जितका मोठा संघर्ष करू, तितके ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ !

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकविध संकटांचा सामना करावा लागला, हे सर्वज्ञातच आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेले हाल तर पुष्कळच आहेत. आर्थिक अडचणींमुळे लहानपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाल्याचे काम आणि सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवण्याचे कामही करावे लागले होते. या सर्व मंडळींनी जीवनातील संघर्षावर स्वतःच्या कर्तृत्वाने मात करून कीर्तीचे उत्तुंग शिखर गाठले. साधकांनी तर श्री गुरु स्वामी असतांना । धरू का भीती मरणाची ॥, यानुसार संघर्षाला कशाला भ्यायचे ? उलट जीवनात आपण जितका मोठा संघर्ष करू, तितके आपण ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाच्या आणखी जवळ जाऊ, हे लक्षात ठेवून श्रद्धेच्या बळावर संघर्षावर मात करायचा प्रयत्न करावा.

– (पू.) श्री. संदीप आळशी (२३.३.२०१७)

Leave a Comment