आपत्काळात साधना करण्यास आपल्या अवतीभवती अध्यात्माला पोषक आणि पूरक वातावरण असेलच असे नाही; म्हणून आतापासूनच ‘कोणत्याही परिस्थितीत देवाच्या अनुसंधानात कसे रहाता येईल ?’, हेच पहावे. आपल्या मनाकडून तसा सरावही करून घ्यावा. आपण मनाला सतत भावाच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपत्काळात पुढे कितीही कठीण प्रसंग आला, तरीही मनाची स्थिती डळमळीत होत नाही. पुढे संकटकाळीही देव आठवतो आणि ‘संकटकाळात देव आपल्याला साहाय्य करतो’, याची अनुभूतीही आपल्याला येते. आपत्काळात हेच आपल्या साधनेचे फलित आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !