जेव्हा सद्गुरूंचे त्याच्या शिष्यावर नियंत्रण असते, त्या वेळी शिष्याच्या जीवनात चांगलेच घडत जाते. शिष्याच्या मनात अयोग्य विचार आले, तरीही गुरु त्याला एखाद्या लहान बाळाप्रमाणे समजून घेत असतात. शिष्याच्या बुद्धीप्रमाणे सद्गुरु प्रत्यक्ष प्रसंगातही त्याला बरेच काही शिकवत असतात. यातूनच शिष्याचे मन आपोआपच घडत जाते. गुरुसेवा करतांना शिष्याच्या मनात कितीही प्रमाणात नकारात्मक विचार आले, तरीही शिष्याने गुरुसेवा सोडू नये. हीच तर त्याची परीक्षा असते. गुरुसेवा करतच शिष्याचा मनोलय झाला की, सद्गुरूंना अपेक्षित अशी साधनेला पोषक असणारी कृती शिष्याकडून आपोआपच होऊ लागते. सेवेतून सतत होणार्या या दैवी विचारांच्या संस्कारांनी एक दिवस सद्गुरु शिष्याचा मनोलय आणि बुद्धीलय करून घेऊन त्याच्यावर पूर्णतः ‘ईश्वरी सत्ता’ प्रस्थापित करतात. यालाच ‘ईश्वरप्राप्ती होणे’, असे म्हणतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !