ॐ’ कार स्थिती क्षणिक साधणे, म्हणजे साधना नाही. बर्याचदा काय होते की, ‘कुंडलिनी शक्ती जागृत झाली की, काही जणांचा ॐकार आतूनच चालू होतो.’ यामुळे देहातील तमोगुण न्यून होऊ लागतो; मात्र ही स्थिती कायम टिकेल, असे नसते. त्यासाठी नियमित स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे लागते. यामुळे जिवावरील अयोग्य संस्कार नष्ट होऊ लागतात आणि जिवाचे चित्त हळूहळू शुद्ध होऊ लागते. साधनेमध्ये तळमळीला अत्यंत महत्त्व आहे. ईश्वरप्राप्तीची तळमळ, गुरुसेवेची तळमळ, मोक्षप्राप्तीची तळमळ यांनी साधक झपाटून गेला पाहिजे. साधकाने जीवनामध्ये अखंड समष्टी सेवेचा ध्यास घेतला, तर त्याची लवकर प्रगती होते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !