कलियुगातील रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती !

‘पूर्वीच्या युगांमध्ये समाज सात्त्विक होता. त्यामुळे ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग यांसारख्या विविध मार्गांनी साधना करू शकत असे. कलियुगामध्ये समाज साधना करत नसल्यामुळे पूर्ण वातावरण रज-तमप्रधान झाले आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या साधनामार्गांनी साधना करणे अतिशय कठीण झाले आहे. अशा या रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.११.२०२१)

राजकीय पक्ष जनतेला स्वार्थी बनवतात याउलट साधना त्याग करायला शिकवते !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘माझेच गुरु श्रेष्ठ आहेत !’, असे म्हणणे हा शिष्याचा आत्मकेंद्रितपणा आणि अहंकार होय !

‘प्रत्येक संतांचा साधनामार्ग आणि त्यांचे या भूतलावरील कार्य निराळे असते. काही संत चमत्कार करून लोकांचा अध्यात्म आणि देव यांवरील विश्वास वाढवतात. काही संत लोकांच्या सांसारिक समस्यांचे निवारण करून त्यांना साधनेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देतात, तर काही संत साधकांकडून केवळ साधना करवून घेतात. याचा अर्थ संत प्रत्येक टप्प्याला अडकलेल्या जिवांना त्यांच्या टप्यातून पुढे घेऊन जात … Read more

सनातनच्या साधकांना मिळणारे कल्पनातीत आध्यात्मिक ज्ञान !

‘कथा आणि कादंबर्‍या यांमधून मांडण्यात येणार्‍या संकल्पना काल्पनिक असतात. त्यात मांडलेल्या विचाराला विज्ञानाचा आधार नसतो. सध्याचा भ्रमणभाषचा शोध हा १८ – १९ व्या शतकातील लोकांसाठी कल्पनातीत होता. काल्पनिक आणि कल्पनातीत या दोन शब्दांमध्ये असा भेद आहे. तशाच प्रकारे सनातनच्या काही साधकांना मिळणारे विविध विषयांवरील ज्ञान हे ‘कल्पनातीत’ आहे. या ज्ञानात दिलेली एखाद्या घटनेमागील आध्यात्मिक कारणमीमांसा … Read more

कुठे हिंदु धर्माची श्रेष्ठता कळणारी उपकरणे तर कुठे अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले !

‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो !

‘प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो. प्रजा हल्लीसारखी स्वार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात निष्क्रीय असली, तर लोकशाही कशी असते, याचे भारत हे जगातील एकमेव केविलवाणे उदाहरण आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा साधकांच्या चपलांप्रतीचा उच्च भाव !

आपल्या साधकांच्या चपला म्हणजे ‘गुरुपादुका’च आहेत. ‘वस्तू काय आहे ? कुणाची आहे ?’, यापेक्षा त्या वस्तूप्रतीचा भाव महत्त्वाचा आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

खरी ‘देवपूजा’

‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

‘म्हणे, साम्यवाद !

शरीर, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात जगातील ७५० कोटींपैकी कोणत्याही दोन व्यक्तींत साम्य नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले