हिंदु धर्म
मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्या रुग्णाला औषधे जितकी आवश्यक आहेत, तितकाचा मानवाला हिंदु धर्म आवश्यक आहे. त्याला विसरल्यामुळे हिंदूंची आणि मानवाची अवस्था मरणोन्मुख झाली आहे. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))
मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्या रुग्णाला औषधे जितकी आवश्यक आहेत, तितकाचा मानवाला हिंदु धर्म आवश्यक आहे. त्याला विसरल्यामुळे हिंदूंची आणि मानवाची अवस्था मरणोन्मुख झाली आहे. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))
‘अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. शिष्य जेव्हा गुरूंकडून ज्ञान मिळवतो, तेव्हा तो त्याग करण्याऐवजी काहीतरी मिळवत असतो. याउलट सेवा करतांना तन व मन यांचा त्याग होतो; म्हणूनच जिज्ञासूपेक्षा सेवा करणारे शिष्य गुरूंना जास्त आवडतात.’ – डॉ. आठवले (२३.७.२००७, सायं. ६)
आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय सांगता येत नाहीत. … Read more
१. मानसिक स्तर: ‘बरोबर असले की आनंद होतो. चूक झाली असता, ती का झाली याचे शास्त्र कळले की तेव्हाही आनंद होतो. आनंद म्हणजे सत्य व सत्य म्हणजेच बरोबर. – सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा. २. आध्यात्मिक स्तर : ज्ञानयोगानुसार सर्वत्र फक्त ब्रह्मच असल्याने त्यात ‘चूक व बरोबर’ असे काही नसते – डॉ. आठवले (८.७.२००७)
‘हिंदू धर्मांतर करतात; कारण हिंदूंमध्ये धर्माभिमान नाही. हिंदूंना धर्माभिमान नाही; कारण हिंदूंना धर्मशिक्षण नाही. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्नशील आहे. हिंदूंच्या दुःस्थितीच्या कारणाच्या मुळाशी जाऊन ते दूर करण्याचा प्रयत्न सनातन संस्था करते !’ – डॉ. आठवले (१६.३.२००७)
‘मनाने मनन केले जाते. चित्ताने चिंतन केले जाते, तर बुद्धीने निर्णय घेतले जातात. अध्यात्मात शास्त्रप्रमाण हा शब्द आहे; पण प्रत्येकाची बुद्धी निराळी असल्याने ‘बुद्धीप्रमाण’ हा शब्दच नाही !’ अर्थ : बुद्धी निर्णय घ्यायचे कार्य करते. ‘बुद्धी’ हा शब्द ‘अहं’शी संबंधित असतो आणि ‘अहं’ हा आध्यात्मिक उन्नतीला घातक असल्याने त्याला अध्यात्मात शून्य टक्के महत्त्व आहे.’ – … Read more
‘अध्यात्मात जास्तीतजास्त ५० टक्के एवढेच ज्ञान शब्दांत मिळू शकते. त्यापुढचे सर्व ज्ञान अनुभूतींनीच मिळते. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. १. जिथे साखरेची गोडी शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभवावीच लागते, तिथे चांगल्या आणि वाईट शक्ती, भाव, चैतन्य, आनंद अन् शांती इत्यादी आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचा अर्थ शब्दांत कसा सांगता येईल ? २. लांबी, रुंदी, उंचीआणि काळ … Read more
‘अंतर्मनात अखंड नामजप चालू आहे कि नाही, हे समजण्याच्या खुणा म्हणजे झोपेतून जाग आल्यावर नामजप चालू असल्यास ते अनुभवणे, संभाषण संपल्यावर नामजप चालू होणे, आपले काम चालू असतांना मधे मधे नामजपाची आठवण होणे इत्यादी.’ – डॉ. आठवले (२१.६.२००७)
हल्ली (अयोग्य विचारांमुळे) वायूमंडल बिघडलेले असल्यामुळे श्वासाबरोबर बिघडलेले (दूषित) विचारही मनात येतात आणि मनोविकार होतात. तसेच इतर विचारही मनात येतात. श्वासाबरोबर नामजप करतांना इतर विचारांचे प्रमाण अल्प होते आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारचा अनुभव आल्याचे जिवास भासते. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज
भावार्थ : ‘इन्सानको सबूर नहीं’ म्हणजे व्यावहारिक अर्थाने फुरसत नाही, वेळ नाही आणि आध्यात्मिक अर्थाने आयुष्य इतके लवकर निघून जाते की, साधना करायला वेळच मिळत नाही. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज