कर्तव्य

आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

श्रद्धेचे महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

समष्टी साधना करतांना संचित आणि प्रारब्ध नष्ट कसे होते?

समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)

प्रल्हादाच्या भक्तीचा उगम त्याच्या जन्मापूर्वीच्या संस्कारांत असणे

१. एकदा हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी वनात गेला होता. तेव्हा बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन नारायण नारायण असे म्हणत त्याचा तपोभंग केला. हिरण्यकश्यपू रागावून घरी आला. पत्नी कयाधूने विचारले, पोपट काय म्हणत होता ? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. तिने पुनःपुन्हा तेच विचारले. तेव्हा हिरण्यकश्यपूचा १०८ वेळा नारायण नारायण असा जप झाला. त्या रात्री संभोग होऊन कयाधूला गर्भधारणा … Read more

चेहरा हसरा ठेवायला शिका आणि स्वतःला आणि इतरांना आनंद द्या !

देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, … Read more

उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही !

उपाय म्हणून औषधे घेतल्यास त्यांचा कधी दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो; पण उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही ! – डॉ. आठवले (१८.६.२०१४)

कलेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे !

कलाकाराने एखादी अप्रतीम कलाकृती कोणाला दाखवली, तर ती पहाणार्‍याला केवळ व्यक्तीगत सुख देते. ती पहाणार्‍याला काही शिकवू शकत नाही. याउलट एखाद्याला अध्यात्म विषयक काही सांगितले, तर त्याला आनंद मिळतो आणि ते ज्ञान इतरांना देऊन तो इतरांनाही आनंदी करू शकतो. याचा अर्थ हा की, कला व्यष्टी साधनेत साहाय्य करते, तर ज्ञान समष्टी साधनेसाठी उपयुक्त आहे. – … Read more

व्यक्ती आणि देव यांवरील प्रेम

१. व्यक्तीवरील प्रेम : शारीरिक आकर्षण हा साध्या प्रेमाचा पाया असतो. प्रेयसीविषयीचे किंवा प्रियकराविषयीचे प्रेम हे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक उपजत बुद्धीपासून निर्माण होते आणि ते प्रत्येक जिवंत प्राण्यात आणि माणसात असते. १ अ. देवावरील प्रेम : देवाविषयी प्रेम केवळ माणसात असते. जे निर्माण करावे आणि वाढवावे लागते. २. व्यक्तीवरील प्रेम : पुरुषाचे स्त्रीविषयी आणि … Read more

दुःखे नष्ट करण्याचे अध्यात्म सोडून इतर उपाय निश्चितपणे परिणामकारक नसतात !

रोग औषधांनी बरे होऊ शकतात. वातावरण पालटण्याने मानसिक रोगांची तीव्रता अल्प होते. मंत्रांनी किंवा देवतांची पूजा केल्याने पिशाचांचे निवारण होऊ शकते; परंतु हे उपचार निश्चितपणे रोग किंवा दुःख निवारण करतीलच, अशी खात्री नसते. काही रोग असाध्य असतात. प्रारब्धामुळे होणारे रोग किंवा दुःखे उपाय करूनही नाहीसे करता येत नाहीत. सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तर सुखम् । – महाभारत, … Read more

अध्यात्माची श्रेष्ठता!

विज्ञानाचा अभ्यास केलेले अध्यात्मविषयक तत्त्वांचे विश्‍लेषण करू शकत नाहीत; पण अध्यात्माचा अभ्यास केलेले विज्ञानातील तत्त्वांचे अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विश्‍लेषण करू शकतात ! – डॉ. आठवले (१४.६.२०१४)