‘साधना’ हीच खरी लस
‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘गुरु किंवा ईश्वर यांच्या चरणी पूर्ण समर्पित झाल्यावर स्वतःविषयीचे विचार पुष्कळ अल्प होतात. आपण सतत ईश्वरी अनुसंधानात असलो, तर ईश्वराचेही आपल्याकडे लक्ष असते. गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना एखाद्या वेळी आपल्या संदर्भात काहीतरी प्रतिकूल जरी घडले, तरी ‘ते ईश्वरेच्छेनेच झाले आहे; म्हणून … Read more
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. ईश्वरप्राप्तीच्या प्रवासात केवळ साधकच नाही, तर त्याहूनही अधिक गुरुच त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
अध्यात्मात चूक असे काही नसते. प्रत्येक प्रसंग साधकाला घडवण्यासाठी घडतो. ‘प्रसंगातून शिकणे आणि पुढे जाणे’ एवढेच असते. -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
ज्या कार्यात अध्यात्माचा पाया नाही, त्यामध्ये देव नाही आणि अशा कार्याला यशही लाभत नाही. -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले