नामाच्याही पुढे केवळ ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागतो आणि तेव्हा देवच भक्ताची सेवा करू लागतो

‘नामाच्याही पुढे केवळ एकच ध्यास उरतो, तो म्हणजे ईश्वरप्राप्तीचा ! ईश्वरालाच ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘ब्रह्म’ एकच आणि अविनाशी आहे. भक्ताच्या या अवस्थेत देवच भक्ताचे नाम घेण्याचे कार्य करतो. आधी भक्त देवाची सेवा करतो आणि नंतर देवच भक्ताची सेवा करू लागतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्री गुरूंची सेवा केल्यावर संकुचित वृत्ती जाऊन व्यापकता येणे

‘भगवंत किंवा गुरु यांची सेवा करणे’, हेच आयुष्यातील आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे संकुचित वृत्ती सुटते आणि समाजाच्या कल्याणाचा विचार होऊ लागतो. व्यापक संकल्पना मनात आणल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही; कारण भगवंत व्यापक आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

१. लक्ष्य (ध्येय) : ‘श्री गुरूंच्या शिकवणीनुसार स्वतःला पूर्णत: गुरुचरणी (परमात्मास्वरूपात) समर्पित करणे, हे उत्तम शिष्याचे ध्येय असते. २. लक्षण : गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’ – (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, (१३.१.२०२३)

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! दोन व्यक्तींमधील ‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे, एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीकडून काहीतरी मागून घेणे. अशा मागण्यामुळे आपण इतरांचे देणेकरी होतो. त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी. असे असले … Read more

स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या शुद्धीसाठी करावयाची साधना !

देहाचा प्रकार आणि करावयाची साधना १. स्थूल – उपवास, प्राणायाम, हठयोग २. सूक्ष्म ( मन ) – नामजप, स्वभावदोष निर्मूलन ३. कारण (बुद्धी) – अध्यात्माचा अभ्यास ४. महाकारण (अहं) – कृतज्ञता, शरणागती आणि श्रद्धा वाढवणे, तसेच अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करणे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ईश्वरप्राप्तीसंदर्भात मनुष्याची लाजिरवाणी उदासीनता !

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कोणी विचारही करत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

जगातील सर्वश्रेष्ठ पदवी !

‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्‍या गुरूंचा ‘खरा शिष्य’ ! ’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

खरे अध्‍यात्‍म !

‘साधनेचे प्रयत्न करतांना प्रथम बुद्धीच्‍या स्‍तरावर ‘देवच माझ्‍या माध्‍यमातून सर्व करत आहे’, असा भाव ठेवावा लागतो. साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्‍यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्‍हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्‍यात्‍म आहे !’ – (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)