‘भित्रेपणा’ वर केवळ ‘साधना करणे’, हाच उपाय !

‘भित्रेपणा’ हा मूलतः स्वतःबद्दलच्या विचारांची तीव्रता अधिक असल्यामुळे येत असतो, म्हणजेच साधकत्वाच्या अभावामुळे येत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी कितीही मानसोपचार केले, तरी अपेक्षित लाभ होत नाही. त्यावर ‘मी’पणा कमी करणारी साधना करणे’, हाच खरा उपाय आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवाकडे कधी काही मागू नये !

‘देवाला ‘प्रत्येक जीव माझ्याकडे परत जावा’, याची तळमळ अधिक असते. त्यासाठी तो प्रत्येक जिवाला आवश्यक ते वेळोवेळी देतच असतो. त्यामुळे आपण देवाकडे कधी काही मागण्याची आवश्यकताच उरत नाही. अशा परिस्थितीमध्ये देवाकडे काही मायेतील गोष्टी मागणे, ही एक स्वेच्छा होते. साधना करतांना मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला प्रार्थना करणे, हा केवळ ईश्वरावरील श्रद्धा वाढण्यासाठीचा साधनेतील एक टप्पा … Read more

कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य !

‘भक्तीयोगानुसार साधना करणारा नामजपाच्या माध्यमातून अखंड साधना करू शकतो; कारण देवाचा नामजप करण्यासाठी त्याला स्थळ, काळ यांसारख्या घटकांची मर्यादा नसते. ज्ञानयोगी वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन करू शकतो, कर्मयोगी असेल त्या परिस्थितीत अपेक्षारहित राहू शकतो, हठयोगी केवळ श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून अखंड साधनारत राहू शकतो. अशा प्रकारे कोणत्याही मार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य … Read more

खरा ब्राह्मण !

ईश्वरप्राप्तीची तळमळ असणाराच खरा ब्राह्मण होय ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेच्या संदर्भात नुसते प्रश्न विचारू नका, कृती करा !

‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन (Ours is not to reason why, ours is … Read more

ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर साधनेत प्रगती होणे

‘व्यक्तीमध्ये गुण निर्माण झाल्यावर तो गुण तिच्यात सर्व ठिकाणी दिसतो. सेवा कोणतीही असो, उदा. चित्रीकरण करणे किंवा स्वयंपाक बनवणे याची सेवा असू दे. सर्व ठिकाणी गुण सारखेच असतात. त्यामुळे सेवा करतांना नेहमी गुणवृद्धी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सेवा होत राहील; पण ती गुणात्मक व्हायला हवी. गुणात्मक सेवा, म्हणजे ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर आपोआप साधनेत … Read more

सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व !

नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

समाजाला मोक्षप्राप्ती करून देणार्‍या शिक्षण मंदिरांची नितांत आवश्यकता आहे !

‘भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगणे, ‘ते कसे घ्यायचे ?’, हे शिकवणे’, हेच खरे शिक्षण आहे. मृत्यूनंतर डोक्यातील ‘गणित आणि विज्ञान’ या सर्व जडातील विषयांची राखरांगोळी होते. केवळ शाश्वत असणारे देवाचे नामच त्या जिवाच्या समवेत जाते. शाळेतील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम गुरु हा जीवनातील खरा मार्गदर्शक आहे. ‘गुरूंचे महत्त्व जे शाळा शिकवत नाही, ती शाळा आणि … Read more

‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते !

केवळ आधुनिक वैद्य आणि अभियंता अशा पदव्या घेऊन उपयोग होत नाही, तर अध्यात्मातील पदवी घ्यावी लागते, म्हणजेच अध्यात्मात साधना करून प्रगती करावी लागते. मगच देवाची पदवी संपादन करता येते. ‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते. गणित, भूगोल इत्यादी अशाश्वत विषयांमुळे नव्हे, तर गुरुकृपेमुळे आणि गुरूंची शिकवण कृतीत आणून साधना केल्याने … Read more

जीवनातील नित्य परीक्षेचे महत्त्व

‘समोर जी व्यक्ती आली, तीच आपला ‘गुरु’ आहे’, असे मानून साधना केली पाहिजे. ‘देव कुणाच्या रूपात येऊन आपली कधी परीक्षा घेईल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे उत्तम शिष्य नेहमीच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सिद्ध असतो. देव कधी गुरूंच्या रूपाने परीक्षा घेतो, तर कधी सामान्य माणसाच्या रूपातही तो येतो. आपले नित्य जीवन हीच आपली एक परीक्षा … Read more