पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !

‘पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या ‘विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये’ इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! याकरिता पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाल्यामागील कारण !

‘स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, हिंदूंच्या सद्य:स्थितीचा विचार मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर न करता आध्यात्मिक स्तरावर करा !

‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आद्य शंकराचार्यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आदर्श हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य !

‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नागरिकांच्या आत्महत्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे उत्तरदायी !

‘पाश्‍चात्त्य देशांत अन्न-वस्त्र-निवारा असूनही मानसिक अस्वास्थ्यामुळे तेथील नागरिक आत्महत्या करतात. याउलट भारतातील जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सरकारांनी पूर्ण न केल्यामुळे येथील नागरिक आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

‘नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत. ‘या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले