तंत्रशास्त्राची वैशिष्टे

१. तंत्रशास्त्र शक्तीशी संबंधित आहे. त्याच्या पुढे भाव, चैतन्य, आनंद आणि शांती असे स्तर आहेत. २. तंत्रशास्त्राप्रमाणे कृती करतांना बहुदा स्थुलातील वस्तू लागतात, तर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूतीसाठी स्थुलातील वस्तू लागत नाहीत. ३. व्यवहारातील अडचणी सोडवण्यासाठी तंत्रशास्त्र उपयुक्त आहे. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची हानी कशी होते, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल. १. व्यक्तीस्वातंत्र्यवाले प्राण्यांप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यामुळे ते मनुष्यजन्म वाया घालवतात. २. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे वागणे स्वकेंद्रित असते. ते इतरांची पर्वा करत नाहीत. यामुळे त्यांचा अहंभाव वाढतो. जितका अहंभाव कमी, तितकी सच्चिदानंदाची अनुभूती अधिक अधिक येते, हे त्यांना … Read more

स्वभावदोष आणि अहं यांच्या त्यागाचे महत्त्व

साधनेत केवळ तन, मन आणि धन यांचा त्याग पुरेसा नाही. अहंचा त्याग महत्त्वाचा असतो. अहंचा त्याग करणे अत्यंत कठीण असल्यामुळे सुरूवातीला तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास सांगितले जाते. त्यांचा त्याग केला, तरी मी त्याग केला, असा अहं रहातो. त्याचबरोबर काही स्वभावदोषही रहातात. यासाठी साधनेत तन, मन आणि धन यांच्या त्यागापेक्षा स्वभावदोष आणि अहं … Read more

टेबल-खुर्चीचे दुष्परिणाम

पूर्वी सर्वजण मांडी घालून बसून जेवण, लिखाण इत्यादी सर्व करायचे, आता बहुतेक सर्वच कृती टेबल-खुर्चीचा वापर करून केल्या जातात. त्यामुळे पाय गुडघ्यात पूर्णपणे वाकत नाही; म्हणून खाली मांडी घालून बसता येत नाही. पुढे शौचालयातही खाली बसता येत नाही. एवढेच नव्हे, तर कमोडवरही बसता येत नाही. हे त्रास होऊ नयेत म्हणून घरी जेवण, लिहिणे, वाचणे इत्यादींसाठी … Read more

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे सर्वनाशाकडे वाटचाल !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छा. जितके व्यक्तीस्वातंत्र्य अधिक तितका व्यक्तीचा अहंकार अधिक असतो आणि तितकी ती व्यक्ती प्रथम परेच्छा आणि नंतर ईश्‍वरेच्छा यांपासून अधिकाधिक दूर जाते आणि दुःखी होते. – डॉ. आठवले (४.४.२०१४)

नामजप लिहून खिशात ठेवा

प्रसारात असलेल्या साधकांना बर्‍याचदा नामजप करण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी त्यांनी नामजप लिहिलेला कागद खिशात आणि साधिकांनी पर्समध्ये ठेवावा. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

देवघरातील प्रत्येक देवतेला निराळा नमस्कार करा !

घरी एखाद्याने पूजा केली की, घरातील इतर देवघरापुढे उभे राहून सर्व देवांना मिळून एक नमस्कार करतात. याऐवजी त्यांनी प्रत्येक देवतेच्या चित्राकडे किंवा मूर्तीकडे पाहून तिला तिचे नाव घेऊन नमस्कार केल्यास नमस्काराचा, साधनेचा अवधी थोडा वाढतो, तसेच त्यामुळे प्रत्येक देवतेबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागते. – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

बुद्धीप्रामाण्यवादी आणि पाश्‍चात्त्य

बुद्धीप्रामाण्यवादी आपल्याला ज्ञात आहे, तेवढेच ज्ञान समजतात आणि जिज्ञासा नसल्यामुळे इतर गोष्टी नाकारतात. याउलट पाश्‍चात्त्य जिज्ञासा असल्यामुळे पुढे शिकत जातात, नवीन शोध लावतात ! – डॉ. आठवले (२१.३.२०१४)

हिंदूंनी धर्माचरण न केल्यास त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागणे !

हिंदूंनी धर्माचरण केले नाही, साधना केली नाही, तर त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागते; कारण खरा धर्म ज्ञात असूनही त्यांनी त्याचे पालन केलेले नसते. इतर पंथियांना धर्म म्हणजे काय ? हेच ज्ञात नसल्याने त्यांच्याकडून अज्ञानापोटी ज्या चुका होतात, त्यासाठी त्यांना हिंदूंपेक्षा अल्प शिक्षा भोगावी लागते. देशातील नियम ज्ञात असूनही त्याचे पालन न केल्यास … Read more