सनातन हिंदु संस्कृतीचा विध्वंस करणारे नेहरू चाचा

हिंदु विवाहपद्धती म्हणजे वेश्यावृत्ती आहे, (Hindu marriage is a prostitution.) असे सुभद्रा जोशी या सदस्या विदुषीने संसदभवनामध्ये सर्वांसमोर सांगितले. नेहरू आदींनी त्याला संमती दिली. नेहरूंच्या दहशतीमुळे संसदेमध्ये कुणी काहीही बोलले नाही, विरोध केला नाही. हिंदु कोड बिल संमत झाले ! आपण ईश्वरासारखे सत्ताधीश असल्याचा बेगुमान उन्माद असलेल्या नेहरूंनी हिंदु कोड बिल संमत करून घेतले ! नेहरू सांगतात, ‘मी हिंदु कोड बिल संमत करवून घेतले खरे; परंतु मला अभिप्रेत असलेला आदर्श समाज मात्र काही त्यातून निर्माण होणार नाही’. आमच्यासारख्या सामान्यांना प्रश्न् पडतो की, नेहरूंनी हा खटाटोप, उपद्व्याप कशासाठी केला ? कारण स्पष्ट आहे, सनातन हिंदु धर्म आणि संस्कृतीचा नामनिर्देश झाला, तरी नेहरूंची कानशिले संतापाने तडकतात. त्यांच्या डोळ्यांतून आग बाहेर पडते. मग या हुकूमशहाने हिंदु संस्कृतीचा विध्वंस करणारे कायदे बनविलेत.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १८.११.२०१०)

Leave a Comment