आश्रमात रहाण्याचे सौभाग्य !
आश्रमात रहातांना भगवंताच्या सतत अनुसंधानात रहाणे अपेक्षित आहे. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी साधकांची साधनेसाठी सोय व्हावी, यासाठी आश्रमाची निर्मिती केली आहे. या आश्रमात रहाण्यासारखे भाग्य कुठे मिळणार नाही. पैसे देऊन एवढे सौभाग्य मिळत नाही. या आश्रमात आपल्याला विनामूल्य सर्व सौभाग्य मिळत आहे. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
