पापी लोकांनी गंगा इत्यादी सात्त्विक नद्यांत, जलाशयांत आणि समुद्रात स्नान केल्याने त्यांतील पाणी रज-तमप्रधान होणे, ते प्रदूषण स्थुलातील प्रदूषणापेक्षा अधिक हानीकारक असणे; पण भारतातील अनभिज्ञ सरकार त्यासंदर्भात काहीच करत नसणे !

‘पुंडलिक यात्रा करत असतांना त्याला काशीपासून ३ मैल अलीकडे कुक्कुट ऋषींचा आश्रम दिसला. तेथे त्याने मुक्काम केला. तेथे त्याला रात्रीच्या वेळी वर्णाने काळ्याकुट्ट असलेल्या आणि मलीन वस्त्रे परिधान केलेल्या ३ स्त्रिया ऋषींच्या आश्रमात येतांना दिसल्या. त्यांनी रात्रभर ऋषींची सेवा केली आणि सकाळी सडासंमार्जन करून त्या परत जाऊ लागल्या. हे पाहून पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून विचारले, … Read more

हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली असणे अन् त्यामुळे मनाची एकाग्रता होऊन योग्य धारणा निर्माण होणे

आपल्या हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली आहेत. त्यामुळे मनाची एकाग्रता होते आणि योग्य धारणा निर्माण होते. त्यामुळे मानवाला पाप-पुण्याची चाड निर्माण होत असल्याने त्याच्या हातून पापाचरण होत नाही आणि म्हणूनच त्याला सत्य दर्शन होते.

साधना न केल्याने शासनकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी असणे; परंतु सध्याचे राजकारणी साधना करत नसल्याने त्यांच्या हातून सतत पापच घडत रहाणे ‘शेवटी माणूस त्याच्या स्वभावदोषाप्रमाणेच वागतो. स्वभावदोष-निर्मूलन करणे, म्हणजेच ‘साधना करणे’, हाच यावर उपाय आहे. पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी होते आणि त्याप्रमाणे ते राज्यकारभार करत होते. राजेसुद्धा संन्यास घेऊन साधनेसाठी अरण्यात … Read more

खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे !

‘ज्ञान’ हे पावित्र्य आणि मांगल्याचे जन्मस्थान आहे; म्हणूनच खर्‍या अर्थाने ज्ञानी, म्हणजेच विद्वान मनुष्याची किर्ती दूरवर पसरते. असे हे ज्ञान मनाच्याही पलीकडील निर्गुण अवस्थेत गेल्यानंतर जी अनुभूती येते, ते खरे ज्ञान ! खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे ! आपण ‘आपल्याला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे’, असे म्हणतो, ती खरे म्हणजे त्या गोष्टीची … Read more

साधना न केल्याने राज्यकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

‘१५.५.२०१८ या दिवशी कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. दैनिकातील वृत्तानुसार विरोधी पक्षातील आमदार फोडण्यासाठी पैसे देणे, यांना आमीष दाखवणे चालू होते. यातून ‘सर्व पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत’, हे सिद्ध होते. यावरून ‘केवळ सत्तेच्या लोभापोटी मनुष्य कसा वागतो आणि तो प्रत्यक्ष कसा असतो’, हे लक्षात येते.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेमुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांच्यातील आत्मचैतन्याचे बळ वाढणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगांतर्गत अष्टांग योगानुसार साधना सांगितली आहे. या माध्यमातून साधकांची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी निरनिराळ्या सत्संगांच्या माध्यमांतून (आढावा सत्संग, स्वभावदोष निर्मूलन सत्संग इत्यादी) ते प्रयत्न करून घेत आहेत. बर्‍याच साधकांनी याचा लाभ करून घेऊन आत्मोन्नती (आध्यात्मिक उन्नती) करून घेतली आहे. साधकांमध्ये आत्मचैतन्याचे बळ वाढल्यामुळे ते निरनिराळ्या संकटांना निर्भयतेने … Read more

वासनाधीन असणा-यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असून ते त्यांच्या स्वार्थी वासनापूर्तीचे साधन असणे

‘वासनेचा ज्याला स्पर्श होत नाही, विकाराची सामग्री विनायास उपलब्ध असतांनाही, तो अविचल असतो, विकार ज्याच्या आसपासही भटकू शकत नाहीत, तोच (असे केवळ योगी वा संतच असू शकतात.) समाजाचे कल्याण करू शकतो. व्यक्ती आणि समाज यांना असेल तिथून वरच्या पायरीवर हमखास नेतोच नेतो. वासनाधीन असणार्‍यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असते. स्वतःच्या स्वार्थी वासनापूर्तीचे … Read more

सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा !

‘आपल्यात अंतर्मुखता येण्यासाठी सेवा करण्यापूर्वी शरिरातील इंद्रियांना प्रार्थना करून त्यांची अनुमती घेऊन सेवा करावी आणि सेवा झाल्यानंतर प्रत्येक इंद्रियाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. इंद्रियांना गुलामाप्रमाणे वापरायला नको. सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचाच अर्थ प्रथम आपण स्वतः ‘आर्य’ व्हायचे (व्यष्टी साधना करायची) आणि सर्व समाजाला आर्य करण्यासाठी (समष्टी साधनेसाठी) प्रयत्न करायचा.’

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती चैतन्यात असल्याने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय !

‘आपण दिवसभर भाव ठेवून कृती केल्यास आपल्यातील चैतन्यावर असलेले आवरण लवकर दूर होते. आपल्या शरिराभोवती चैतन्याचे आवरण निर्माण झाल्यामुळे बाह्य संकटांचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही. चैतन्याद्वारे आपण कोणत्याही संकटाला निर्भयतेने आणि सहजतेने सामोरे जाऊ शकतो. अशा रीतीने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय आहे. याद्वारेच आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटतो.’

पाश्चात्त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण

‘आज पाश्‍चात्त्य लोक लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्‍या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत. दैवी विचारांचा लोप होत आहे. ते दुष्ट लोक स्वतः समृद्ध होण्यासाठी अणु बॉम्ब इत्यादी प्रलयकारी शस्त्रे बाळगून, दुसर्‍यांना शांतीच्या नावावर शस्त्रे बाळगण्यापासून परावृत्त करत आहेत. हिडीस नृत्य, बेसूर … Read more