हिंदु राष्ट्र-संस्थापनेचे कार्य परमनिष्ठेने करा !

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठीचा संदेश

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना माझा नमस्कार ! सध्या देश आणि काल संक्रमण अवस्थेतून जात आहे. या प्रतिकूल काळात आपल्याला हिंदु राष्ट्र-स्थापनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे आहे. आपल्या साहाय्याला अत्यल्प धर्मनिष्ठ सहकारी आहेत, तर धर्मशत्रू आणि त्याचे समर्थक सहस्रोंच्या पटींनी आहेत. शत्रूंची अधिक संख्या आणि प्रतिकूल काळ असतांना ‘आपण बुद्धी, धन किंवा बाहू यांच्या बळावर कार्य करू’, असा विचार करणे अयोग्य ठरेल. अशा काळात केवळ साधनेद्वारा प्राप्त केलेला ईश्‍वराचा आशीर्वादच अंतिम यश प्राप्त करून देऊ शकतो; म्हणूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ध्येयप्राप्तीची तळमळ, त्यासाठी आवश्यक तन-मन-धनाचे समर्पण आणि साधनेचे बळ वाढवणे आवश्यक ठरणार आहे.

लक्षात ठेवा, हिंदु राष्ट्र आपल्याला सहज मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला परमनिष्ठेने कार्य करावे लागेल. या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून सर्व धर्मप्रेमींना असे कार्य करण्याची प्रेरणा मिळो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

Leave a Comment