साधनेत शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचे कार्य

शरीर : ‘शरीर चांगले असले, तर साधना करता येते. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’, म्हणजेच ‘साधनेसाठी शरीर चांगले आवश्यक आहे.’

मन : मनाला साधनेचे महत्त्व कळले की, साधनेला आरंभ होतो.

बुद्धी : बुद्धीला साधनेचे महत्त्व कळले की, साधना चांगली होते.

चित्त : साधनेमुळे चित्तावरील संस्कार अल्प होऊ लागले की, शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांचा साठा चित्तात निर्माण होतो आणि त्यामुळे साधना अधिक चांगली होते.

अहं : साधनेमुळे अहं नष्ट झाला की, मोक्षप्राप्ती होते.

Leave a Comment