हिंंदु संस्कृतीची वैशिष्ट्ये

१. हिंदु संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी नवीन पिढीवरील संस्कार महत्त्वाचे ! :
प्रत्येक देशाचे अस्तित्व म्हणजेच त्या देशाची जीवनप्रणाली आणि संस्कृती यांचे अस्तित्व. ही संस्कृती पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी नवीन पिढीवर जन्मापासून केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात.

२. हिंदु संस्कृतीनुसार विवाह हा करार नसून ईश्वराने निर्माण केलेला संस्कार असणे :
आपली संस्कृती ४ आश्रम, १६ संस्कार, पंचयज्ञ आणि सनातन धर्माच्या नियमांचे काटेकोर पालन यांवर आधारित आहे. विवाह हा कायदा, करार नसून ईश्वराने निर्माण केलेला संस्कार आहे, असे आपण मानतो.

३. विवाह आणि घटस्फोट यांच्या समस्यांमुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी पालकांना वेळ नसल्याने तरुण पिढी संस्कारहीन आणि व्यसनाधीन होणे :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन म्हणतात, उद्याची अमेरिका ही बेवारस मुलांचा देश बनत चालली आहे. विवाह, घटस्फोट, विवाहित पालकांचे एकमेकांपासून वेगळे रहाणे, यांमुळे संस्कारक्षम वयातील मुले संभ्रमित, हवालदिल झाली आहेत. कित्येक मुले शाळा सोडत आहेत. ती खून, मारामाऱ्या करत आहेत. व्यसनांच्या आहारी जात आहेत. कित्येक मुले बेवारसपणे मार्गावर फिरत आहेत. त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांचे संरक्षण करणे, यांसाठी त्यांच्या पालकांकडे वेळ नाही.

४. पाश्चा्त्त्य आणि भारतीय संस्कृती यांच्या विवाहविषयक विचारसरणीतील भेद ! :
भारतीय संस्कृतीत पती-पत्नी एकमेकांसमवेत ७ जन्म रहाण्याचा विचार करतात आणि आम्हाला मृत्यूच एकमेकांपासून दूर करील या विचारसरणीचे ते असतात, तर पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये जोपर्यंत पती-पत्नी एकमेकांना सुख देऊ शकतात, तोपर्यंतच ते एकत्र रहातात. पाश्चात्त्यांच्या या विचारसरणीमुळे विदेशात ६० टक्के विवाहितांचे घटस्फोट होतात.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (१८.९.२०१३)

(संदर्भ : संस्कार वेध, लेखक : अॅड्. शंकर निकम)

Leave a Comment