श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी !

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना करून विडंबन !

मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिका-याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

प्राचीन काळापासून विविध योगमार्गांनुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे आध्यात्मिक महत्त्व !

‘ऋषि किंवा मुनि म्हटले, की आपले हात आपोआप जोडले जातात आणि आपले मस्तक आदराने झुकते. या भरतखंडात अनेक ऋषींनी विविध योगमार्गांनुसार साधना करून भारताला तपोभूमी बनवले आहे.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.

अशून्यशयन व्रत

‘आषाढ कृष्ण (वद्य) पक्ष द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयन व्रत’ केले जाते. या वर्षी ही तिथी १८.७.२०१९ या दिवशी आहे. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.

भावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी !

वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्‍वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी !

श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ

१. संपूर्ण मूर्ती ओंकार, निर्गुण. १ अ. सोंड १ अ १. उजवी सोंड उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या … Read more

शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

देवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात.

शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि त्रैलोकात शांती प्रस्थापित करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

नवरात्रीच्या काळात भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेणार आहोत