सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.

श्री गणेशाची चॉकलेटपासून बनवलेली मूर्ती पुजण्याचा पणजी येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांचा धर्मद्रोही उपक्रम !

श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर आसगाव येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांनी चॉकलेटपासून श्री गणेशमूर्ती बनवल्या आहेत.

मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना करून विडंबन !

मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिका-याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

पर्यावरणप्रेमींचा दुटप्पीपणा नव्हे, तर निवळ हिंदुद्रोह !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. आपले आराध्य देवतेचे कार्य कोणते, त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आदी सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्रीय माहिती मिळाल्यास देवतेप्रती आपला भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते.

देवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका !

देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे.

मुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती !

धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणा-या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत.