प्राचीन काळापासून विविध योगमार्गांनुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे आध्यात्मिक महत्त्व !

मानवाच्या सर्वांगीण कल्याणार्थ जीवन व्यतीत केलेल्या ऋषिमुनींच्या चरणी कोटीश: प्रणाम !

‘ऋषि किंवा मुनि म्हटले, की आपले हात आपोआप जोडले जातात आणि आपले मस्तक आदराने झुकते. या भरतखंडात अनेक ऋषींनी विविध योगमार्गांनुसार साधना करून भारताला तपोभूमी बनवले आहे. त्यांनी धर्म आणि अध्यात्म यांविषयी विपुल लिखाण केले आहे अन् समाजात धर्माचरण आणि साधना यांचा प्रसार करून समाजाला सुसंस्कृत बनवले आहे. आजचा मनुष्य प्राचीन काळातील विविध ऋषींचा वंशजच आहे; परंतु मनुष्याला याचा विसर पडल्यामुळे त्याला ऋषींचे आध्यात्मिक महत्त्व ज्ञात नाही. साधना केल्यावरच ऋषींचे महत्त्व आणि सामर्थ्य समजू शकते.

 

१. ‘ऋषि’ या शब्दाचा अर्थ

ईश्‍वरप्राप्तीसाठी जे दीर्घकालीन साधना करतात, त्यांना ‘ऋषि’ म्हणतात.

 

२. ऋषिपंचमी तिथी

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला ‘ऋषिपंचमी’ म्हटले जाते. या दिवशी ऋषींचे पूजन करण्याचे व्रत धर्मशास्त्रात सांगितले आहे.

 

३. व्रताचा उद्देश

मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर झालेला परिणाम, या व्रताने न्यून होतो.

 

४. ऋषिपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी व्रत करून अरुंधतीसहित
सप्तर्षींचे पूजन केल्यामुळे मासिक धर्मामुळे लागलेले दोष नष्ट होणे

या दिवशी स्त्रियांनी व्रत करून अरुंधतीसहित सप्तर्षींचे पूजन केल्यामुळे मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांमुळे लागलेले दोष नष्ट होतात. यावरून आपल्याला ऋषींचे सामर्थ्य लक्षात येते. ऋषींमध्ये ज्ञानबळ, योगबळ, तपोबळ आणि आत्मबळ असल्यामुळे त्यांच्या सामर्थ्याने कर्मदोष नष्ट होतात अन् पापांचे क्षालन होते.

 

५. विविध प्रकारचे बळ, त्यांमध्ये कार्यरत असणारी शक्ती, सूक्ष्म देहांवर
होणारा परिणाम आणि पाप नष्ट होण्याची प्रक्रिया, प्रारब्ध अन् पाप नष्ट होण्याचे प्रमाण

कार्यरत शक्ती कोणत्या देहावर परिणाम होणे पाप नष्ट होण्याची प्रक्रिया प्रारब्ध नष्ट होण्याचे प्रमाण (टक्के) पाप नष्ट होण्याचे प्रमाण (टक्के)
१. बाहुबळ शारीरिक शक्ती स्थूल देह (शरीर) शारीरिक कृती, उदा. गोसेवा करणे २० २०
२. बुद्धीबळ बौद्धिक शक्ती कारणदेह (स्थूल
बुद्धी)
बुद्धी सात्त्विक झाल्याने मनुष्याकडून
सत्कर्म घडणे
२० २५
३. योगबळ योगशक्ती मनोदेह आणि कारणदेह योगसामर्थ्याने, उदा. कुंडलिनीशक्तीची जागृती करून सप्तचक्रे आणि नाड्या यांची शुद्धी करणे ३० ४०
४. ज्ञानबळ ज्ञानशक्ती कारणदेह (सूक्ष्म बुद्धी) ज्ञानशक्तीच्या सामर्थ्याने प्रारब्ध आणि पाप नष्ट होणे ४० ५०
५. देवबळ दैवी शक्ती चित्त दैवी शक्तीच्या साहाय्याने, उदा. उच्च देवतांनी दृष्टांत देऊन कृपा करणे ५० ६०
६. तपोबळ तपःशक्ती महाकारणदेह तपोबळाने शक्तीपात करणे ६० ७०
७. आत्मबळ आत्मशक्ती जीवात्मा गुरुकृपेमुळे आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे आत्म शक्ती प्रगट होऊन ती  सुषुम्नानाडीद्वारे कार्यरत होणे ७० ९०
८. गुरुबळ परम शक्ती परमात्मा श्रीगुरूंच्या कृपेमुळे ग्रहदोष, नक्षत्रदोष,कर्मदोष, स्वभावदोष आदी सर्व प्रकारचे दोष नष्ट होणे १०० १००

 

६. गुरुबळाचे अनन्यसाधारण महत्त्व

वरील सर्व प्रकारच्या बळांमध्ये गुरुबळ सर्वाधिक सामर्थ्यशाली असल्यामुळे सर्व प्रयत्न श्रीगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी केल्यास साधकाला सर्वाधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्याची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्याला मोक्ष मिळू शकतो. त्यामुळे ज्यांना गुरु लाभले आहेत, त्यांना कसलीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. गुरूंना संपूर्णपणे शरण गेलेल्या शिष्याचा सर्व भार गुरु वहातात. यावरून गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.

 

७. विविध देवतांची उपासना करणारे ऋषी

योगसाधना आणि तप केल्यामुळे ऋषिमुनींना अनुक्रमे योगबळ आणि तपोबळ प्राप्त होत असे. प्राचीन काळापासून विविध ऋषिमुनी विविध देवतांची उपासना करायचे. त्यामुळे त्यांना देवतांची कृपा प्राप्त होऊन देवबळही प्राप्त होत असे.

उपास्य देवता देवतेचे भक्त असणारे ऋषी
१. श्री गणेश भृशुंडीऋषि, गणकऋषि, वामदेवऋषि, पराशरऋषि आणि महर्षि व्यास
२. श्रीविष्णु आणि त्याची रूपे वसिष्ठऋषि, भृगुऋषि, वाल्मीकिऋषि, उत्तंगऋषि, शांडिल्यऋषि, गर्गमुनि, कण्डुमुनि आणि नारदमुनि
३. शिव पिपलादऋषि, और्वऋषि, च्यवनऋषि, धौम्यऋषि, शिलादऋषि, दधीचऋषि, गौतमऋषि, शौनकऋषि, दुर्वासऋषि, जमदग्निऋषि, गौतमऋषि, सांदीपनिऋषि, कश्यपऋषि, अगस्तिऋषि आणि शुक्राचार्य
४. दत्त अत्रिऋषि आणि परशुरामऋषि
५. देवी त्वष्टाऋषि आणि मार्कण्डेयऋषि (टीप)
६. सूर्य याज्ञवल्क्यऋषि

टीप : मार्कण्डेयऋषींनी महामृत्यूंजय जप करून शिवाची उपासना केली आणि देवीची उपासना करून ‘दुर्गासप्तशती’ या ग्रंथाची रचना केली.

 

८. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांतील ऋषिमुनींचा
योगमार्ग, योगमार्गाचा सूक्ष्म रंग, योगमार्गानुसार साधना करणार्‍या
ऋषिमुनींचे उदाहरण, योगमार्गानुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे प्रमाण

योगमार्ग योगमार्गाचा सूक्ष्म रंग योगमार्गानुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे उदाहरण योगमार्गानुसार साधना करणार्‍या ऋषिमुनींचे प्रमाण (टक्के)
१. कर्मयोग करडा विश्‍वामित्रऋषि, कश्यपऋषि, गौतमऋषि २०
२. ध्यानयोग केशरी दधीचऋषि, च्यवनऋषि आणि अत्रिऋषि ३०
३. ज्ञानयोग पिवळसर महर्षि व्यास  ऐतरेयऋषि, शौनकऋषि आणि भारद्वाजमुनि ४०
४. भक्तीयोग निळसर वाल्मीकिऋषि आणि नारदमुनि ४०
५. शक्तीपातयोग तांबूस त्वष्टाऋषि २०

 

९ . ऋषीमुनी आणि संत यांतील भेद

ऋषिमुनी संत
१. साधनामार्ग ध्यान, ज्ञान किंवा कर्म योग बहुतांश जणांचा भक्तीयोग
२. सूक्ष्म देहांचा रंग पिवळसर पांढरा निळसर पांढरा
३. सगुण/निर्गुण तत्त्वाची उपासना निर्गुण-सगुण सगुण-निर्गुण
४. सामर्थ्य
४ अ. साधनेमुळे मिळणार्‍या बळाचा प्रकार योगसाधनेमुळे योगबळ आणि तपश्‍चर्येमुळे तपोबळ भक्तीमुळे आत्मबळ आणि गुरुकृपेमुळे गुरुबळ
४ आ. व्यक्त/अव्यक्त व्यक्त अव्यक्त
४ इ. स्वरूप – आशीर्वाद / शाप एखाद्याने चांगले कर्म केल्यास त्याला आशीर्वाद देणे किंवा एखाद्याने वाईट कर्म केल्यास त्याला शाप देणे एखाद्याचे प्रारब्ध न्यून करणे आणि त्याच्यामध्ये ईश्‍वराची भक्ती करण्याची प्रेरणा जागृत करणे
४ ई. साधक आणि शिष्य अवलंबून/स्वयंपूर्ण असणे ऋषी शाप किंवा आशीर्वाद देत असल्यामुळे साधकआणि शिष्य त्यांच्यावर अधिक प्रमाणात अवलंबून असणे साधक आणि शिष्य लवकर स्वयंपूर्ण होणे
५. संबंधित युग सत्य, त्रेता आणि द्वापर कलि
६. संबंधित लोक ऋषिलोक (टीप) जनलोक
७. त्यांच्या संदर्भात येणारी अनुभूती चांगली शक्ती जाणवणे भाव जाणवून आनंदाची अनुभूती येणे

टीप : जन आणि तप या लोंकाच्या मध्ये ऋषीलोक आहे.

 

१०. कलियुगात विविध ऋषिमुनींनी संतांच्या रूपाने जन्म घेऊन उर्वरित साधना पूर्ण करणे

विविध योगमार्गांनुसार साधना करूनही ईश्‍वराविषयी भाव निर्माण न झाल्यामुळे अनेक ऋषिमुनींना समाधान जाणवत नव्हते. त्यामुळे काही ऋषिमुनींनी द्वापरयुगात गोपींच्या रूपात जन्म घेऊन भगवंताचे मूर्तीमंत स्वरूप असणार्‍या श्रीकृष्णाच्या सगुण रूपावर आध्यात्मिक प्रेम केले. त्याचप्रमाणे अनेक ऋषिमुनी कलियुगात संतांच्या रूपाने जन्माला येऊन भक्तीयोगानुसार साधना करून पूर्णत्वाला गेले आहेत. त्यामुळे ऋषींना योगबळ, तपोबळ, ज्ञानबळ आणि देवबळ यांसह भक्ती केल्यामुळे आत्मबळ अन् गुरुकृपेमुळे गुरुबळ यांचीही प्राप्ती होते आणि त्यांच्या मोक्षसाधनेला पूर्णत्व प्राप्त होते. संतांच्या सहवासात राहिल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे कलियुगातील अनेक जिवांचा उद्धार होतो. कलियुगात खर्‍या संतांचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ असतांना सनातन संस्थेमध्ये १०० हून अधिक संत आहेत. केवढी ही गुरुकृपा ! साधकांना या घोर कलियुगात गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या विविध संतांच्या रूपात विविध सूक्ष्म लोकांतील आणि युगांतील ऋषिमुनींचेच दर्शन घडत आहे. यासाठी आम्ही सर्व साधक ऋषितुल्य असणार्‍या सर्व संतांच्या चरणी कृतज्ञ आहोत.

 

संत आणि गुरुमाऊली यांच्या चरणी कृतज्ञता

भगवंताच्या कृपेमुळे साधकांना संतांचा सत्संग आणि मार्गदर्शन लाभत आहे, तसेच त्यांची सेवा करण्याची अमूल्य संधी लाभत आहे, यासाठी आम्ही सर्व साधक संतांच्या चरणी कृतज्ञ आहोत. केवळ परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या रूपाने आम्हाला विविध संतांची कृपा प्राप्त होत आहे, यासाठी आम्ही परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment