श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.

माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2023)

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा आणि चंपाषष्ठी

महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा हे आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. ‘जयाद्रि माहात्म्य’ यात या खंडोबादेवाचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी, धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो, अशी समज आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मीचे माहात्म्य !

‘काशी क्षेत्राहून जवभर सरस असणारे, मनुष्याला ऐहिक सुख आणि मुक्ती देणारे करवीर क्षेत्र इ.स. पूर्व ५ व्या किंवा ६ व्या शतकातील आहे’, असे मानले जाते. श्री महालक्ष्मीची मूर्ती ज्या हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची बनवली आहे, त्यावरूनही या देवालयाची प्राचीनता सिद्ध होते.

थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय

‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

श्रीविष्णुसहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले ? याविषयीची सुरस माहिती

सहदेव आणि व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामह यांना विष्णुसहस्रनाम म्हणतांना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाद्वारे ध्वनीलहरींद्वारे विष्णुसहस्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल, अशी असते

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

बसलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि सनातन-निर्मित उभ्या असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र यांच्या संदर्भातील प्रयोग

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रात ती उभी दाखवली आहे. अनेकदा हितचिंतक आणि साधक या चित्राच्या संदर्भात पुढील सूत्र सुचवतात, श्री लक्ष्मीदेवी उभी न दाखवता ती बसलेली हवी.

आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

प्रभु श्रीरामांचा जन्म होण्यामागे अनेक उद्देश असणे !

‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.