होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्‍यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी साजरी करा ! – सनातन संस्था

वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.