कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2023)

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.

कृष्ण जन्माष्टमी पूजा (मंत्र आणि अर्थासह)

या लेखात श्रीकृष्ण पूजाविधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास श्रीकृष्ण पूजा अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होईल.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.