महाशिवरात्र (Mahashivratri 2023)
महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शिवाची उपासना करावी.
महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शिवाची उपासना करावी.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !
जिवंतिका पूजन ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे.
आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
नवरात्रीमध्ये देवीतत्त्व नेहमीपेक्षा एक सहस्र पटींनी कार्यरत असते. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय. ‘घडा’ या पारंपरिक नृत्याचा होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
‘नृत्य करणा-या व्यक्तीवर गरबा नृत्याचा आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
नवरात्रोत्सवात देवीच्या देवळात जाऊन देवीची ओटी भरणे शक्य नसल्यास घरीच देवघरातील कुलदेवीची ओटी भरावी.
चांद्रवर्षाचे ३५४ दिवस आणि सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात. म्हणजेच या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे, तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा; म्हणून स्थूलमानाने सुमारे ३२॥ (साडेबत्तीस) मासांनी एक अधिकमास धरतात.
शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.
‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् संतान प्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते.