अशून्यशयन व्रत

 

१. व्रताचा कालावधी

‘आषाढ कृष्ण (वद्य) पक्ष द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयन व्रत’ केले जाते. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.

 

२. व्रताची देवता

या दिवशी शेषशय्येवर विराजमान झालेल्या, श्रीवत्स चिन्हांकित, चार भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या श्री नारायणाची पूजा करतात.

 

३. व्रतविधान

अ. दिवसभर मौन पाळून अखंड श्री नारायणाच्या अनुसंधानात रहावे.

आ.चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे.

 

४. फलप्राप्ती

‘या व्रताने घरावरील संकट टळते आणि अखंड सौभाग्यसुख मिळते’, असे भविष्य पुराणात सांगितले आहे. ’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, तथा ज्योतिष विभागप्रमुख, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment