मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना करून विडंबन !

मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिका-याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

देवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका !

देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे.

मुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती !

धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणा-या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत.