उपवासचा अर्थ
उप म्हणजे जवळ. उपवास म्हणजे भगवंताच्या चरणी शरणागत भाव ठेवून वास, म्हणजे वस्ती करणे, म्हणजे रहाणे. २४ घंटे भगवंताच्या अनुसंधानात रहाणे म्हणजे उपवास. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०१४)
उप म्हणजे जवळ. उपवास म्हणजे भगवंताच्या चरणी शरणागत भाव ठेवून वास, म्हणजे वस्ती करणे, म्हणजे रहाणे. २४ घंटे भगवंताच्या अनुसंधानात रहाणे म्हणजे उपवास. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०१४)
जातीच्या बंधनातून बाहेर पडत असणारे सनातनचे वधू-वर साधक ! : समाजातील बर्याच वधू-वरांच्या विज्ञापनांत जातीचा हवा / हवी, असे लिहिलेले असते. त्याचप्रमाणे सनातनचे बरेच वधू-वर साधक आणि साधिका यांच्या विज्ञापनांत सनातनचा हवा / हवी, असे असते, म्हणजे सनातनचे साधक आणि साधिका आता जातीच्या बंधनातून बाहेर पडून धर्माकडे वाटचाल करत आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. … Read more
व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, हेही व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांच्या लक्षात येत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तात्काळ कळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी, तर कुठे हे विश्वची माझे घर, असे म्हणणारे व्यापक दृष्टीचे संत ज्ञानेश्वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. डॉक्टर संमोहन उपचारतज्ञ असण्याचा त्यांना आध्यात्मिक संशोधनात झालेला लाभ : मी साधनेत खूप उशिरा, म्हणजे ४२ व्या वर्षी आलो, याचे मला वाईट वाटायचे. आज लक्षात आले की, प्रत्यक्षात मला त्याचा आध्यात्मिक क्षेत्रातही लाभच झाला आहे. १. मनोरुग्णांवर उपाय करण्यासाठी काही संमोहन उपचारपद्धती शोधल्या. त्यामुळे स्वभावदोष आणि अहं दूर कसे करायचे, हे रुग्णांना शिकता आल्याने … Read more
रामनाथी आश्रमात वायुतत्त्वाची अनुभूती स्पर्शाच्या माध्यमातून येणे : माझ्या खोलीत अधिक प्रमाणात, तर आश्रमात सर्वत्र अल्प प्रमाणात जमिनीला पावलाने स्पर्श केला, तर अनेक साधकांना सौम्य आनंददायी झिणझिण्या जाणवतात. हे जमिनीत वायुतत्त्व कार्यरत झाल्याचे लक्षण आहे. काही साधकांना गुडघ्यापर्यंत, तर काहींना हातांत किंवा डोक्यातही तशा संवेदना जाणवतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वयंपाकाची अनेक पुस्तके वाचूनही स्वयंपाक करता येत नाही. त्याप्रमाणे साधनेसंदर्भात शेकडो पुस्तके वाचूनही साधना होत नाही. स्वयंपाक करण्याप्रमाणे साधनेची कृती करणे आवश्यक असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल ! : सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न … Read more