अध्यात्मात वेडे व्हा !
अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात. लोकही तसेच आहेत. पर्याय नसल्याने लोकांना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ मत द्यायचे; म्हणून मत दिले जाते. आज जरी नकारात्मक मतदानपद्धत … Read more
सर्व जगाच्या कल्याणासाठी दीपस्तंभ असलेल्या हिंदु धर्माचे तेज संपूर्ण विश्वात प्रस्थापित केल्याविना शांत बसू नका !
आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.
परिस्थिती प्रतिकूल असल्याची कारणे सांगणारा मनुष्य जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही. याउलट प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारा मनुष्य जीवनात यशस्वी होतो !
‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठीचा संदेश ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना माझा नमस्कार ! सध्या देश आणि काल संक्रमण अवस्थेतून जात आहे. या प्रतिकूल काळात आपल्याला हिंदु राष्ट्र-स्थापनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे आहे. आपल्या साहाय्याला अत्यल्प धर्मनिष्ठ सहकारी आहेत, तर धर्मशत्रू आणि त्याचे समर्थक सहस्रोंच्या पटींनी आहेत. शत्रूंची अधिक संख्या आणि प्रतिकूल काळ … Read more
आपल्या प्रारब्धात असेल, तेवढेच देव देतो. साधना न करता सकामातील नुसत्या प्रार्थना कितीही केल्या, तरी आपण मागतो, ते देव देत नाही. असे असतांना प्रार्थना करायची कशाला, तर प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होते; म्हणून !
भावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.
‘लहान मुले आई-वडिलांकडून २ – ३ वर्षांतच मातृभाषा बोलायला शिकतात; पण मोठ्यांना दुसरी भाषा बोलायला शिकायला काही वर्षे द्यावी लागतात !’