अध्यात्माचे श्रेष्ठत्व !
‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार मिथ्या आहे, हे कुणालाच आपोआप उमजत नाही. नुसत्या गप्पा येतील; पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही, लक्ष्मी चंचल आहे, इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो’, या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत, असा कुणीही नाही; पण मनातले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे किती निघतील ? मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत … Read more
‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९९)
‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव यांच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात आणि व्यष्टी साधनेसाठी जीवन समर्पित करू शकतात. आता काळानुसार समष्टी साधना, म्हणजे हिंदु … Read more
‘व्यष्टी साधना चांगली असेल, तर आपली क्षमता वाढते, सकारात्मकता निर्माण होते आणि समष्टी साधना करण्यासाठी ऊर्जा मिळते. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
‘या नश्वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेही काही वाटत नसते. जसे ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्यास ताप वाढतो, तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतोे. क्षयी मनुष्यास … Read more
‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्या ईश्वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)
‘या सुकणार्या, नश्वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ? भ्रमात राहू नकोस, आपल्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन हो, खरोखरंच दुसरे काहीही नाही. जन्म-मरणाची वार्ता हे शेवटचे भाष्य आहे.’ – प.प. भगवान … Read more